18/08/2026
लोकनेते वसंतरावजी नाईक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन 🌺🙏
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी माननीय महापौर, माननीय उपमहापौर तसेच माननीय सभागृह नेते यांच्या हस्ते स्व. वसंतरावजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात त्यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
स्व. वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी तसेच कृषी, सिंचन, ग्रामीण विकास आणि शेतकरी हितासाठी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या कार्याचे स्मरण करून यावेळी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, नगरसेविका अश्विनी चव्हाण, कामगार कल्याण अधिकारी अजित खानसोळे, भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मंडळ अध्यक्ष महेश देवकर आर. डी. चव्हाण, वसंत पवार, प्रा. वडे सर, धनसिंग राठोड, डॉ. भोजपा जाधव, बी. डी. राठोड, मोहन रजपूत, दामू राठोड, प्रकाश चव्हाण, मधुकर पवार तसेच श्री नेहरूनगर लमाण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील नागरिक उपस्थित होते.
लोकनेते स्व. वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन!
-नरेंद्र गोविंद काळे
सभागृह नेते
सोलापूर महानगरपालिका