Aapulki

Aapulki संत नागरी मध्ये, प्रथमच दर्जेदार व उत्

आपुलकी फुडस्,शेगांव वाटचाल 7 व्या वर्षाकडेमागील 6 वर्षापुर्वी  अत्यल्प पैश्यात सुरु केलेला उपक्रम आज शेगांवकरांच्या प्रथ...
31/12/2025

आपुलकी फुडस्,शेगांव वाटचाल 7 व्या वर्षाकडे
मागील 6 वर्षापुर्वी अत्यल्प पैश्यात सुरु केलेला उपक्रम आज शेगांवकरांच्या प्रथम पसंतीला उतरला आहे.
व्यवसाय हा अत्यल्प पैश्यात उभारुन त्याला जोपासण्याचे काम पिंगळे परिवारातील प्रत्येक सदस्याने जोपासले आहे. माझी कल्पना असली तरी आमचे सहकारी तथा माझ्या परिवारातील माझे वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांची जोड आणि शेगांवकरांचा आमच्या सेवेप्रति असलेला विश्वास हा अविरत आमच्या पाठीशी असल्याने हा सेवाभाव अविरत सुरु आहे. हे विशेष आणि आजवर सेवेची संधी दिल्यामुळे हा उपक्रम नाविन्यपुर्ण वाटचालीस सर्वोतोपरी नावारुपाला येत आहे हे विशेष. तरी आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य होत आहे. तरी सर्वांचे आभार…
शेगांव शहरामध्ये अन्न सेवा व्यवसायात नव्या व्यवसायिंकानी उतरावं ही मनोमन कल्पना होती, आणि माझ्याकडे सल्ला मागणाऱ्या अनेक महिलांना मी वारंवार जेवणाचा व्यवसाय उत्तम व्यवसाय हाच सल्ला देत असलो तरी अनेकांकडून नकार घंटा मिळाली.
सन 2019 च्या सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्या दिवशी चवीचं खाणार आणि आपुलकीने देणार या धर्तीवर आपुलकी फूडस्,शेगांव हा उपक्रम शेगांवात सुरु केला. व्यवसाय सुरु करण्याचा मानस इतकाच होता की, बिना भांडवली व्यवसाय आणि ग्राहकांच्या हिताची व गरज ओळखुन हा सुरु केलेला व्यवसाय आज सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या उपक्रमाकरीता अनेक सहकारी मित्रांकडून पाठिंबा मिळाला आणि शेगांवकरांनी माझ्या या उपक्रमाला प्रथम पसंती दिली त्यामुळे आजची सेवाभावाची भुमिका बजवितांना माझ्या घरातील सर्व सदस्य आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलीचाही सहभाग लागला. या उपक्रमासाठी कर्मचारी आणि किराणा साहित्य पुरविणारे निर्मळ भाऊ यांनी कधीही सकारात्मक भुमिका दिली. तर जेवणाकरीता नेहमी लागणारे दळण आणि त्यांची तत्परता, शेगांव शहरातील पुरातन असलेली पिठाची चक्कीचे संचालक रमेश चव्हाण यांच्याकडून नेहमीच सहकार्य लाभले.
तर या उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीसाठी शेगांवकरांसोबत बाहेरगाव वरुन येणाऱ्या भाविकांची सहकार्याची भावना ही नक्कीच आपलेपणाची राहिली आहे.
मी या उपक्रमाची सुरुवात झाली असली तरी माझ्या मार्गावर कोणत्या चुका आणि त्या सावरण्याकरीता आमचे मार्गदर्शक रविंद्र तायडे, आणि कल्पकता जोपासणारे निलेश घोंगे, उद्योजक युवराज देशमुख आदी मित्र परिवार यांचा नेहमीच महत्वपुर्ण योगदान राहीले आहे. आणि ग्राहकांचा आमचाप्रति असलेला विश्वास आज आम्ही अडी अडचणीवर मात करीत या व्यवसायाची वृध्दीकडे वाटचाल करण्याचा मनस्वी आनंद घेत आहेत. तरी येणाऱ्या काळात आपणा सर्वांचे सहकार्याच्या प्रतिक्षेत…

ागील 6 वर्षापुर्वी अत्यल्प पैश्यात सुरु केलेला उपक्रम आज शेगांवकरांच्या प्रथम पसंतीला उत....

Sunday special मिरची भाजी भाकर चवीचं खाणार त्यास आपुलकीने देणार शेगावकरांची प्रथम पसंतीचे आपुलकी फूड्स शेगाव 070200 8049...
14/12/2025

Sunday special
मिरची भाजी भाकर
चवीचं खाणार त्यास आपुलकीने देणार
शेगावकरांची प्रथम पसंतीचे आपुलकी फूड्स शेगाव
070200 80495

11/12/2025

गुरुवारचा मेन्यू
डाळ बापले
घरगुती जेवणाचा आस्वाद
शेगावकरच्या प्रथम पसंतीचे
आपुलकी फूड्स शेगाव
070200 80495

आपुलकी फूडस्,शेगांव च्या उपक्रमास शेगांवकरांनी दिलेली प्रथम पसंती आणि सातत्यपुर्ण सेवेच्या संधीमुळे अविरत सेवा देण्यास आ...
09/12/2025

आपुलकी फूडस्,शेगांव च्या उपक्रमास शेगांवकरांनी दिलेली प्रथम पसंती आणि सातत्यपुर्ण सेवेच्या संधीमुळे अविरत सेवा देण्यास आम्ही सुध्दा तत्पर आहोत.
कधीकाळी घरपोच सुविधा देण्याकरीता केलेल्या या फुड इंडस्ट्रीमध्येे मिळता प्रतिसाद पाहता भोजनालय सुरु केले आहे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून घरगुती जेवणाचा अस्वाद घेणाऱ्यांच्या संख्येत सुध्दा दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा मनस्वी आनंद आम्हाला पण आहे.
तरी स्पेशल डिशेश व दैनंदिन रुचकर जेवणाची उपलब्धता यामुळे ग्राहकांचे समाधान आमच्याकरीता सर्वोतोपरी असल्यांचा वेगळा आनंद मिळत असतो हे विशेष

संत नगरी थाली- 150/- रुपये पुर्ण जेवण
पोळी,वरण, दोन भाज्या, कडी, पापड, तीन प्रकारच्या चटण्या
नक्कीच स्वाद घ्या..

05/02/2025

Address

Shivaji Nagar, Near D. M. Burungale College
Shegaon
444203

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+917020080495

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapulki posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aapulki:

Share