04/03/2026
दि ड्राईव्ह इन रेस्टॉरंट च्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजक लायन्स क्लब संगमेश्वर व कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था, कोकण प्रांत हे होते. स्पर्धेचा विषय होता वरी (वरई वा भगर) वापरून शाकाहारी पदार्थ. या स्पर्धेस स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद लाभला. स्पर्धेत २९ स्पर्धक सहभागी झाले होते. वरी हे तसे कमी वापरले जाणारे भरडधान्य वा तृणधान्य आहे. असे असूनही स्पर्धकानी खूपच वैविध्यपूर्ण पाककला सादर केल्या होत्या. यामध्ये हांडवा, बिस्किट्स, लाडू, दहिवडे, कोकण क्वीन, सुरळीच्या वड्या, वडे, भाकरी, स्पॉंज बाईट, वेगवेगळे केक, कटलेट, पुडिंग, थालीपीठ, खीर, अप्पे, उकडीच्या शेंगा, कोकणी सुशी, मोमोज, मोदक असे वरीचे वेगवेगळे पदार्थ मांडण्यात आले होते. स्पर्धेसाठी चिपळूण, सावर्डा, देवरुख, संगमेश्वर, पूर्णगड अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून स्पर्धक आले होते. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. स्पर्धा खूपच अटीतटीची झाली.
या स्पर्धेत एकूण चार स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली. प्रथम क्रमांक देवरुख येथील सौ. पूर्वी हितेश पटेल यांच्या दहीवडा या पाककृतीस मिळाला. द्वितीय क्रमांक देवरुख येथील सौ. नुपूर संदीप जोयशी यांच्या बिस्किट्स या पाककृतीस मिळाला. तृतीय क्रमांक जांभुळवाडी, पूर्णगड येथील सौ वर्षा उदय फडके यांच्या कोकण क्वीन या पाककृतीस मिळाला. तर चतुर्थ क्रमांक कुमार कार्तिकेश महेश आयरे या देवरुख येथील उत्कर्ष केटरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यास वरी केक या पाककृतीसाठी मिळाला.
स्पर्धेचे स्पर्धेतील पदार्थांचे परीक्षण सौ. आदिती रामचंद्र देसाई, पावस व सौ. ऋता राहुल पंडित, रत्नागिरी यांनी केले. कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्थेचे श्री. नंदादीप पालशेतकर यांनी सर्व मान्यवरांची ओळख करून दिली. स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. संपदा राहुल जोगळेकर कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनी अन्नभान या विषयावर आपले मौलिक विचार सर्व उपस्थितां समोर मांडले. लायन मनीष चोचे यांनी सर्वांचे आभार मानले, आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
राई कृषी पर्यटन केंद्राचे संचालक अमोल लोध तसेच माणिक लोध ड्रायव्ह इन रेस्टॉरंट चे लोध कुटुंबीय यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.
-----------------------------
The Drive Inn
Contact: +91 9960197010
https://www.facebook.com/TheDriveInnResto
Raaie
https://www.facebook.com/KonkanRaaie
-------------------------------------------
“राई”, निसर्गाच्या कुशीत . . . राईत या माझ्या !
#राईतयामाझ्या
https://goo.gl/maps/BYBE5muNd1YBLfKg8
-------------------------------------------
The Drive Inn
Restaurants And Bar at Dhamani
https://goo.gl/maps/FjJX45iowQyi7Cep7
-------------------------------------------