CITU Pune

CITU Pune This page has been created to reach the masses and the entire working class of Pune district in orde

17/02/2023

पुणे : राज्यभरातील सुमारे २ लाख अंगणवाडी कर्मचारी (सेविका व मदतनीस) २० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संपावर जात आहे...

06/02/2023
06/02/2023

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू)
अखिल भारतीय किसान सभा
अखिल भारतीय शेतमजूर युनियन

कामगार – शेतकरी - शेतमजूर संघर्ष रॅली

५ एप्रिल २०२३ - चलो दिल्ली!

भव्य देशव्यापी मोर्चा !

प्रिय बंधू आणि भगिनींनो !

देशातील श्रमिक जनता मोदी सरकारच्या शेतकरी, कामगार, शेतमजूर व जनताविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे त्रस्त आहे. मेटाकुटीला आली आहे. श्रमिक जनतेने सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांच्या विरोधात एकजूट करू नये यासाठी व आर.एस.एस. प्रणीत धर्मांध एकाधिकारशाही प्रस्थापित करण्याचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी भाजप व आर.एस.एस. प्रणीत संघटना देशात धार्मिक द्वेषाचे विष पेरत आहेत. शासकीय संस्थांचा दुरुपयोग करून दहशतीच्या मार्गाने विरोध मोडून काढत आहेत. लोकशाहीची गळचेपी करत आहेत. देशाची घटना पायदळी तुडवत आहेत. जनता भाजप व आर.एस.एस.च्या या देशविरोधी व जनताविरोधी कारवायांनी व मोदी सरकारच्या श्रमिकविरोधी धोरणांनी महागाई, बेरोजगारी, विषमता यामुळे अक्षरशः भरडली जात आहे.

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू), अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियन या देशव्यापी संघटनांनी या विरोधात दिल्ली येथे दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी भव्य देशव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील लाखो श्रमिक या मोर्चात अभूतपूर्व एकजुटीने व ताकदीने सामील होणार आहेत.

आपल्या मागण्या

1. सर्व कामगार कर्मचाऱ्यांना दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन लागू करा.

2. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सर्व शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भावाचा कायदा करा.

3. सर्वांना दरमहा १० हजार रुपये वृद्धापकाळ पेन्शन द्या.

4. कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द करा.

5. प्रस्तावित शेतकरी, श्रमिक, जनता विरोधी केंद्रीय वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या.

6. वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा.

7. राहात असलेले घर, कसत असलेली जमीन शेतकरी-शेतमजुरांच्या नावे करा.

8. सर्व शेतमजुरांना दर वर्षी २०० दिवस रोजगार हमी मार्फत काम द्या आणि ६०० रुपये प्रतिदिन मजुरी द्या.

9. पीक विम्यातील शेतकरीविरोधी अटी रद्द करून, शेतकऱ्यांना पीक विम्याचा योग्य लाभ द्या.

10. दूध दराला एफ.आर.पी.चे संरक्षण द्या.

11. गरीब व मध्यम शेतकरी व शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा.

12. सार्वजनिक उद्योगांचे व सेवांचे खाजगीकरण रद्द करा.

13. नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईनचे धोरण रद्द करा.

14. कंत्राटी, हंगामी, मानधनावरील आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी अशा योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून कायम करा.

15. असंघटीत कामगारांना सेवाशर्ती, किमान वेतन व कल्याणकारी योजना लागू करा.

16. अग्निपथ योजना रद्द करा.

17. महागाई रोखा व सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करा.

18.अतिश्रीमंतांवर अधिक कर लागू करा.

श्रमिक बंधू भगिनींनो, आपल्या या व यासारख्या सर्व मागण्यांसाठी सुरू असलेल्या संघर्षात संपूर्ण ताकदीने आणि एकजुटीने सामील व्हा ! ५ एप्रिल रोजी लाखोंच्या संख्येने दिल्ली मोर्चात सहभागी होऊन श्रमिक एकजूट बुलंद करा !

आपले

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू)
अखिल भारतीय किसान सभा
अखिल भारतीय शेतमजूर युनियन

30/05/2022
26/03/2022

सीटू महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने
ऑनलाइन जाहीर सभा

रविवार, २७ मार्च सायंकाळी ७ वाजता

विषय : २८,२९ मार्च २०२२ देशव्यापी सार्वत्रिक संप

♦️ अध्यक्ष : डॉक्टर डी एल कराड
♦️ वक्ते : 1. कॉम्रेड एम एच शेख
2. कॉम्रेड शुभा शमीम
3. कॉम्रेड नसीमा शेख
4. कॉम्रेड भरमा कांबळे

👉 खालील लिंक्सवरून अवश्य सहभागी व्हा. जास्तीत जास्त शेअर करा.

https://www.facebook.com/citumaha/

https://youtube.com/channel/UCLd5hm3lI9BJYexhsxX9DtA

23/03/2022

✊🏽 सीटू महाराष्ट्र राज्य कमिटी ✊🏽
7️⃣ सातवे ऑनलाइन चर्चासत्र

गुरुवार, २४ मार्च २०२२, सायं. ६ वाजता

♦️ विषय : वित्तीय क्षेत्र आणि मोदी सरकार
♦️ वक्ते : 1. कॉ. वसंत नलावडे
2. कॉ. अनिल प्रभू
♦️ अध्यक्ष: कॉ. डॉ. विवेक माँटेरो

👉 खालील लिंकवरून अवश्य सहभागी व्हा. जास्तीत जास्त शेअर करा

https://www.facebook.com/citumaha/

https://youtube.com/channel/UCLd5hm3lI9BJYexhsxX9DtA

Address

3, 4, 5, B, UmaShankar Complex, N C Kelkar Road, 594, Narayan Peth
Pune
411030

Telephone

02024452956

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CITU Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category