Mahesh lomate

Mahesh lomate food

22/10/2024
18/10/2024

अतिशय दुर्दैवी घटना! ओंकार च्या मृत्यूस जबाबदार कोण?
धाराशिव शहरातील 23 वर्षीय ओंकार जाधवर हा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका परिसरात आपल्या दुचाकी ने घरी जात असताना संजीवन हॉस्पिटल, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक च्या जवळ त्याची दुचाकी खड्यात आदळली या घटनेत ओंकार च्या डोक्यास मार लागण्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
धाराशिव शहरातील गल्ली बोळातीलच नाही तर चक्क मेन रोड वर सुद्धा जीवघेणे खड्डे पडले आहेत, नगरपालिका,लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचे या खड्याकडे दुर्लक्ष आहे कारण यांच्या कडे मोठमोठ्या गाड्या आहेत यांना खड्याची झळ पोचत नाही, अनेक वेळा मागणी करून सुद्धा या खड्याची बुजवायची तयारी कोणीही दाखवली नाही, परिणामी आज ओंकार चा यात मृत्यू झाला.
खरंच धाराशिवच्या गप बसणाऱ्या जनतेला मानलं पाहिजे मूग गिळून गप्प बसून आपल्या राजकीय नेत्यांनी जी हुजुरी करतात, आज ओंकार च्या घरच्यांनी त्याला गमावलं आहे उद्या तुम्ही या खड्यामुळे आपले जवळचे लोक गमवाल तेव्हा तुम्हला समजेल!
कमीत कमी ओंकार ला श्रद्धांजली म्हणून तरी ते खड्डे बुजवा!नाहीतर येत्या निवडणूक जनता सर्व लोकप्रतिनिधीला दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही!
- मयूर नाईकनवरे

15/10/2024
15/10/2024

निम्न तेरणा उपसासिंचन योजना टप्पा क्र.१ ते ५ योजनेच्या संदर्भात स्थापत्य, यांत्रिकी विद्युत दुरुस्ती व इतर अनुषंगिक कामांच्या विशेष दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश जारी!

ठाकरे सरकारच्या काळात रखडलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या दुरूस्तीला महायुती सरकारने हिरवा कंदिल दाखवत मान्यता दिली होती. त्याचा आज शासन आदेश काढण्यात आला.

१० ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ११३ कोटी रूपयांच्या दुरूस्ती प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांनी पूर्ण केलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या दुरुस्तीची जबाबदारी आपण घेतली होती.

धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि औसा तालुक्यातील शेतकर्‍यांसह धाराशिव शहरालाही याचा मोठा लाभ होणार आहे.

स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी हे तिन्ही स्वतंत्र विभाग आहे. या तिन्ही विभागांची कार्यालये वेगवेगळ्या शहरात आहेत. त्यामुळे या तिन्ही विभागांकडून अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते. स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी यांच्यामध्ये समन्वय घडवून प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी त्याची तांत्रिक मान्यता मिळवून घेतली. या कार्यासाठीचा शासनादेश देखील काढण्यात आला आहे.

#निम्न_तेरणा #सिंचन

14/10/2024
14/10/2024

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नकारात्मक विचारांचे दहन होऊन सकारात्मकता, मांगल्य आणि सुख-समृद्धीचे नवे पर्व सर्वांच्या जीवनात यावे, बळीराजाचे जीवन उन्नत व्हावे हीच विजयादशमी निमित्त आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..

#दसरा

14/10/2024

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

हा दिवस लक्षावधी शोषितांच्या जीवनातील क्रांती घडवणारा ठरला. भगवान गौतम बुद्ध यांची शिकवण आणि महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नेहमीच आपल्याला प्रेरणादायी ठरतील.

#धम्मचक्र #प्रवर्तन

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh lomate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category