Mr. Crispy

Mr. Crispy We serve Fresh Fried Crispy Chicken , Burger, Pizza, Momos, Fries maney more Swiggy Zhomato service available

28/01/2026

राजकारणात दादांवर अनेकदा टिका केली. पण त्या पलिकडे दादा माझा आवडता नेता होते. त्यांचा स्पष्टोक्ती पणा, भाषण शैली, करारी बाणा मला खुप आवडायचा.
2011 ची गोष्ट असेल मी रिलायन्सला नोकरी ला होतो. मला अर्जंट चतुर्शुंगीला ऑफिसला पोचायचे होते. दुपारचे दिड वाजले होते आणि स्टेशनजवळ आंबेडकर पुतळा चौक पोलिसांनी आडवला होता. मी वैतागलो.मी मागून पुढे हळूहळू आलो त्यावेळी एका पोलिसाने माझ्या गाडीच्या पुढच्या चाकावर काठी मारली मला थांबवल.
मी पुढे पाहीले तर अजितदादा कार्यकर्ते समवेत चालत ऐत होते. पोलिसाला म्हणले थांबा तुम्हाला ओळख दाखवतो आणि मी मोठ्याने ओरडलो दादा...
दादा इकडं तिकडं पहात डोळ्यावरचा काळा गॅगल काढत मला हात केला अन म्हणाले अरे बाबा हळू..
घाबरलो ना..
सिग्नलवरील गाड्यावरचे लोक आणि तो पोलिस ही हसायला लागले..
आज विमान अपघाताची बातमी ऐकली दादा सुखरूप असतील या आशेने प्रार्थना करत होतो तोच अजितदादा आपल्याला सोडून गेले या बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

27/01/2026

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ।।१।। अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ।।२।। दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा ॥३॥ तुका म्हणे सांगों किती । जळो तयांसी संगती ।।४।। -
संत तुकाराम महाराजांच्या अभंगा प्रमाणे आपल्या भोवती असे अनेक ढोंगी सोंगी लोक आहेत..
निवडणूक निकालानंतर खरा वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आपला नगरसेवक श्री नितीन दादा गावडे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले.
श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज 750 वर्षे जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज 375 वर्षे सदेह वैकुंठ गमन सोहळ्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात वारकरी रत्न हभप श्री ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ (छोटे माऊली) यांनी वारकरी संप्रदायातर्फे कौतुक करत भरभरून आशीर्वाद नितीन दादांना दिले..🚩🙏🙏🚩

आपली उपस्थिती प्रार्थनीय..🚩🙏🙏🚩
20/01/2026

आपली उपस्थिती प्रार्थनीय..🚩🙏🙏🚩

11/01/2026

मी कट्टर मोदी भक्त 2011 ला मोदींचे प्रत्यक्ष भाषण ऐकले अन त्या प्रेरणेने मी देव देश धर्मा च्या सेवेचा विडा उचलला. 2017 च्या निवडणुकीत उस्फुर्त सहभाग घेतला माझ्या सहभागामुळे ते निवडून आले असे मी कधीच म्हणणार नाही. पण ते आज स्वतः च्या नावापुढे जे बिरूद मिरवत आहेत ते जनमानसात रूजवण्याचे काम मी केले.
निवडून आल्यानंतर पुर्ण प्रभागाच्या गल्ल्यांन गल्ल्या पंचविसते तीस वेळा प्रभागातल्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी "सकाळी सकाळी नगरसेवक आपल्या दारी" या संकल्पनेच्या नावे फिरवले.
आज ते म्हणतात मी एवढे कोटीची विकास कामे केली मला माहीत नाही कोणत्या उद्देशाने केली.
जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी निधी आणला की स्वतः च्या विकासासाठी.
प्रत्यक्ष वास्तव जनतेला माहीत नसते.
मला सांगा काळे पडळ ते ससाणे नगर रोड या एक ते दिड किलोमीटर च्या पट्टयात मनपाच्या दोन शाळा होत्या, एक खाजगी शिक्षण संस्थेची शाळा आहे तसेच गल्लोगल्ली शाळा आहेत.
काळे पडळ ग्लायडींग सेंटर च्या भिंती जवळ बिल्डर एमेनिटीस्पेस मध्ये इ लर्निग शाळेचे भुमिपुजन झाले. तसेच ससाणे नगर रोडवर एका जागेवर शाळेचे आरक्षण होते. मी स्वतः सुचवले आपला माणुस म्हणून त्या ठिकाणचे आरक्षण बदलून ससुनच्या धर्तीवर अद्यावत 50 ते 100 बेडचे हाॅस्पीटल उभारावे.
आरक्षण बदलता ऐते. महापालिकेत, शहर सुधारणा समिती, स्थायी समितीत ठराव मंजूर करायचा पण त्याला त्या विधानसभेच्या आमदारांची सही लागते.
मुद्दा एवढाच होता त्याचे क्रेडिट यांच्या वरिष्ठ नेत्याला म्हणजे त्या वेळच्या आमदारांना जाईल.
केवळ क्रेडिट दुसऱ्याला जाईल म्हणून तीथे शाळाच बांधण्यात आली आणि हडपसर वासीयांना मनपा हाॅस्पीटल पासून वंचित ठेवण्यात आले. आज चार वर्षे पुर्ण झाली दोन्ही इमारती बांधून पुर्ण झाल्या पण तिथे एकही विद्यार्थाचे एडमिशन नाही की एक ही शिक्षक नियुक्त नाही.
पक्षातल्या एकमेकांच्या कुरघोडीत हडपसरच्या गोर गरीब सर्व सामान्य जनतेचे मुलभुत गरजेवर नक्कीच पाणी फेरले. कारण प्रभागात आता जागाच शिल्लक नाही.
या गोष्टी ला मी विरोध केला तर खड्या सारखा मला बाजूला केला. कट कारस्थान रचून मला पार "मणोरूग्ण" आहे असे दाखवले. राजकिय बहिष्कार टाकला.
मी खुप भोगल सत्य बोलण्याचे.अन मी बोलतच रहाणार भले माझा जिव गेला तरी चालेल कारण चुकिच्या गोष्टींना विरोध करणे ही पण एक प्रकारे देश सेवा आहे.
कारण मी स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेता नाही कारण मी स्वतंत्र भारतात जन्मलो अन नाही मी सिमेवर शस्त्र घेऊन लढू शकत नाही.
जनतेने ठरवावे हे खरच आपल्या मुलभुत गरजांचा विचार करत होते का अजून काही..🙏🙏

10/01/2026

जनता अशा लोकांना योग्य जागा दाखवेल..🚩🙏🙏🚩

09/01/2026

जनता योग्य ती जागा दाखवेलच..🚩🙏🙏🚩

Address

Sr. No. 37, "Sharangpani", Onkarcolony, Lane No. 3, Kale Padal, Hadapsar
Pune
411028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mr. Crispy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mr. Crispy:

Share