Authentic Malvani

Authentic Malvani Authentic Malvani Vegeterian NonVegetarian food

मित्रांनो आणि मैत्रिणींनो...पहा, वाचा, विचार करा आणि कृपया नक्की सांगा मला इथे कॉमेंट्स मध्ये कसा होईल आणि आवडेल का हा अ...
28/04/2015

मित्रांनो आणि मैत्रिणींनो...पहा, वाचा, विचार करा आणि कृपया नक्की सांगा मला इथे कॉमेंट्स मध्ये कसा होईल आणि आवडेल का हा अस्सल पारंपारीक मालवणी आणि पूर्ण शाकाहारी मेनू तुमच्या जेवणात तुम्हाला ते..

काल संध्याकाळी गार्गीला ज़रा विश्रांती आणि चेंज म्हणून भेंडीचे मालवणी सार , सुरणाची कापे आणि भात असा स्वयंपाक केला मी स्वतः...

आणि नंतर हां फ़ोटो फेसबुकावर टाकल्यावर बऱ्याच मित्र-मैत्रिणींचे फोन आले आणि त्या डिस्कशन्स मधुनच हां एक भन्नाट मेनू आकार घेता झाला....

मेनू.......

चुलिवरचे भेंड़ीचे सार ,
तांदळाचे जाळीदार लुसलूशीत घावन/तांदळाची क्रिस्प भाकरी(as per ur choice) ,
सुरणाची मालवणी आंबट-तिखट कापे ,
कांदा-दहयाची खमंग कोशिंबीर,
पोहयाचे मिरगुंड ,
ताज्या खोबरया-लाल मिरचीची झणझणीत चटणी ,
गरमागरम भात ,
आत्मन सुखवणारी नारळाच्या दुधाची - अस्सल मालवणी चव थेट मेंदूला भिड़वणारी सोलकढी (मुद्दाम उल्लेख केला नारळाच्या दुधाचा कारण इथे पुण्यात बरेच लोक सर्रास ताकाची सोलकढी देतात जी भयंकर लागते) ,
आणि सर्वात शेवटी अविट माधुर्य ओतप्रोतणारी स्वीट मालवणी डिश 'शिरवाळे घाटलं'...

कसा वाटतोय बेत ?
आवडेल ना जातिवंत खवय्यांना ?

तुम्ही सर्वच जण जाणकार, जातिवंत आणि जागरूक खवय्ये आहात ही माझी खात्री आहे...

तेव्हा...Authentic Malvani चा हां नवीन अस्सल मालवणी पारंपारीक मेनू लॉक करायला मला मदत करा ही नम्र विनंती...

तुमचा मित्र,
मिलिंद

आज सकाळी 'घावन-चटणी' या अस्सल पारंपारीक मालवणी 'ब्रेकफास्ट' डिश ची ऑर्डर पुण्यातल्या सहकार नगर मधल्या एका हास्यक्लबच्या ...
27/04/2015

आज सकाळी 'घावन-चटणी' या अस्सल पारंपारीक मालवणी 'ब्रेकफास्ट' डिश ची ऑर्डर पुण्यातल्या सहकार नगर मधल्या एका हास्यक्लबच्या 15 मेंबर्सना पोचवली....

धन्यवाद मिलिंद....या टेम्प्टिंग फोटोसाठी...

तुमची मैत्रीण,
गार्गी,
शेफ़, ऑथेंटिक मालवणी

आज सकाळी पुण्यातल्याच एका १५ जणींच्या भिशी क्लबला त्यांच्या मासिक भिशीच्या कार्यक्रमासाठी Authentic Malvani ने सप्लाय के...
24/04/2015

आज सकाळी पुण्यातल्याच एका १५ जणींच्या भिशी क्लबला त्यांच्या मासिक भिशीच्या कार्यक्रमासाठी Authentic Malvani ने सप्लाय केलेली एक भन्नाट, सात्विक आणि पूर्णपणे शाकाहारी अस्सल मालवणी डिश ,

शिरवाळे - घाटलं....

मालवणी पद्धतीने प्रक्रिया केलेल्या जातिवंत स्थानिक तांदळाच्या ताज्या लुसलुशीत शेवया आणि सोबत मधुर चवीचे वेलची पूड घातलेले नारळाचे ताजे अवीट स्वादिष्ट दुध...

घासागणीक अंतरात्मा सुखावणारी दीर्घकाळ रेंगाळणारी चव....

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,मनापासून आभार...सर्वांचे मनापासून शतशः आभार...Authentic Malvani तर्फे आम्ही जाहीर केलेल्या "का...
20/04/2015

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

मनापासून आभार...सर्वांचे मनापासून शतशः आभार...

Authentic Malvani तर्फे आम्ही जाहीर केलेल्या "काळ्या वाटाण्याचे सांबार, वडे आणि सोलकढी कॉम्बो" च्या फेस्टिवलला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचेच मनापासून आभार...

शनिवारी एकंदर 72 ऑर्डर डिलिव्हरी आणि रविवारी एकूण 106 ऑर्डर डिलिव्हरी केल्या Authentic Malvani च्या टीमने...

रविवारी दुपारी 12 नंतर आलेल्या सर्व 8 ग्राहक खवय्यांची, त्यांची ऑर्डर न स्वीकारल्याबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो...
पण couldn't help away with these orders...
कारण सर्वच मसाले आणि प्रीपेरेशंस आम्ही पूर्णतः ताजेच करत असल्याने आधी आलेल्या ऑर्डर्सच आम्ही घेऊ शकलो...
आणि म्हणून आयत्या वेळी आलेल्या सर्व 8 ग्राहकांची आम्ही सर्वचजण पुन्हा एकदा नम्र माफी मागतो...
तुम्हा सर्वांचे नंबर्स आम्ही नोंदवून ठेवले आहेत आणि पुढच्या वेळी तुमच्या ऑर्डर्स नक्की पूर्ण करू...
मात्र आत्ता ऑर्डर न घेतल्याबद्दल तुम्हाला मिळेल एक बोनस गिफ्ट आमच्याकडून :) :)

या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांचे पुन्हा एकवार मनापासून आभार...खूप खूप आभार

तुमचे प्रेम आहेच, ते असेच वृद्धिंगत व्हावे हि नम्र विनंती ,

तुमची मैत्रीण ,

सौ. गार्गी मिलिंद वेर्लेकर

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,गेले अनेक दिवस विविध मांसाहारी मालवणी डिशेसची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने बऱ्याच जण...
16/04/2015

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

गेले अनेक दिवस विविध मांसाहारी मालवणी डिशेसची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने बऱ्याच जणानी फर्माईश करून सुद्धा "काळ्या वाटाण्याचे सांबार , तांदळाचे मालवणी वडे आणि सोलकढी" ही अस्सल जातिवंत मालवणी शुद्ध शाकाहारी डिश खूप इच्छा असूनही करणे जमतच नव्हते...

याच्या असंख्य ऑर्डर्स नाईलाजानेच होल्डवर ठेवाव्या लागल्या आहेत.
आता या 'आलिशान मालवणी कॉम्बो' डिशची इच्छा प्रदर्शित करणाऱ्या खवय्यांना नाराज करणे मुळीच योग्य नाही...

यातीलच एका शाकाहारी खवय्याने शेवटी शनिवार रविवार या पदार्थांचा महोत्सव जाहीर करण्याचा मार्ग सुचवला.

ही कल्पना मला आणि मिलिंदला ही आवडली...

म्हणूनच Authentic Malvani तर्फे आम्ही या शनिवार आणि रविवार जाहीर करत आहोत....
"काळ्या वाटाण्याचे सांबार, वडे आणि सोलकढी कॉम्बो"

साधारणत: 3 ते 4 जणांच्या कुटुंबाला पुरेसे होतील अश्या या कॉम्बोचे डिटेल्स खालीलप्रमाणे,

काळ्या वाटण्याचे सांबार हंडी - 250/-
चुलीवर शिजवलेले साधारण १ किलो घट्ट सांबार (सर्वसाधारणपणे ४ जणांना पुरेल इतके )

मालवणी वडे - 150/-
4 प्लेट वडे - एका प्लेट मध्ये 5 वडे - एकूण 20 वडे
(अजून जास्त वडे पाहिजे असल्यास 40/- प्रती प्लेट वडे)

ताज्या नारळाच्या दुधाची सोलकढी - 150/-
250/- मिलीलीटर x 4 ग्लास = एक लिटर

सोबत कांद्याची खुसखुशीत खेकडा भजी छान लागतात ,
हे काळ्या वाटाण्याचे सांबार गरमागरम भातावर अप्रतिम लागते....लिंबू मात्र न विसरता पिळा.

शनिवारच्या लंच अथवा डिनर साठी कृपया शुक्रवारी रात्रीपर्यंत ऑर्डर नोंदवावी,
रविवारच्या लंच अथवा डिनर साठी कृपया शनिवारी रात्रीपर्यंत ऑर्डर नोंदवावी हि नम्र विनंती....

फक्त टेक-अवे साठी...
होम डिलिव्हरी नाही...

तुमची मैत्रीण,
गार्गी

ऑर्डरसाठी संपर्क क्रमांक - 90 49 45 75 75 / 98 60 04 24 29
Authentic Malvani
पारंपारीक घरगुती मसाल्यांच्या अस्सल मालवणी पाककृती……

Cooked n Delivered the Heart-Healthy Fish tikki for some Party...Unique creativity Heart-Healthy Ingredients of Fish Tik...
15/04/2015

Cooked n Delivered the Heart-Healthy Fish tikki for some Party...Unique creativity

Heart-Healthy Ingredients of Fish Tikki -

Boneless Mackerel (highest Omega 3 Fatty acids that keeps d Heart Healthy) , Oats (fights High BP n Lowers Cholesterol), Flaxseeds(lowers cholesterol n triglycerides), Walnuts (Lowers high BP), Olive oil (Best for Heart functioning), Potato(high on Potassium that lowers BP)....

If U r planning some party...do try this thing... very tasty n healthy too

आत्ताच एक ऑर्डर डिलिव्हर केली ,मालवणी फिश करी राइस , फ्राय हलवा आणि सोलकढ़ी....
11/04/2015

आत्ताच एक ऑर्डर डिलिव्हर केली ,
मालवणी फिश करी राइस , फ्राय हलवा आणि सोलकढ़ी....

हे जे काही कॉम्बो आहे ना ते अद्भुत आहे ,Simply out of the world ,गरम मोकळा फळफळीत भात, लज्जतदार आंबट अन किंचीत तिखट तरीह...
03/04/2015

हे जे काही कॉम्बो आहे ना ते अद्भुत आहे ,
Simply out of the world ,
गरम मोकळा फळफळीत भात, लज्जतदार आंबट अन किंचीत तिखट तरीही थेट मेंदूत चवीचा ठसा उमटवणारी अस्सल मालवणी स्वादाची नारळाच्या दुधाची सोलकढी आणि सोबत तळलेले पोहयाचे मिरगुंड...
यावर ताव मारताना फ़क्त एक काळजी नक्की घ्यायची,
हा भात थोड्याश्या मोठ्या चमच्याने खायचा आणि प्रत्येक चमच्यात भात आणि सोलकढी सुद्धा अंमळ यायला हवी...
निव्वळ अद्भुत स्वर्गीय चव....निव्वळ अद्भुत

नक्की ऑर्डर नोंदवा..ताजी आमसुल आली आहेत
सोलकढी भात

ओले काजू ,Awesome treat.....
01/04/2015

ओले काजू ,
Awesome treat.....

21/03/2015

Address

1787, Sadashiv Peth
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Authentic Malvani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category