30/08/2019
हा सन विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपला बळीराजा त्याच्या बैलांची पूजा करतो. पोळा हा श्रावण महिन्यातील पितोरी अमावास्येला येतो,
या दिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना शाल झालरींनी सजवले जाते, त्यांच्या शिंगांना रंगवले जाते, गळ्यात हार घातले जातात. व शेतकऱ्यांची बायको त्यांची पूजा करते.
संध्याकाळच्या वेळी सजवलेल्या बैलांची ढोल तशान्सोबत मिरवणूक काढली जाते, यातील वयस्कर बैलाच्या शिंगांना आंब्याच्या दोरांनी मखर भांध्लेला असतो व तो ओढीचा असतो, त्याच्या पाठोपाठ इतर बैलांना सुद्धा हे करावे लागते. मग सर्व बैल ओळीने उभे केले जातात. यांचा क्रम त्यांच्या मालकाच्या गावातील स्थानाप्रमाणे असते. काही गावांमध्ये तर जत्रा भरवली जाते व स्पर्धा आयोजित केल्या जातात.
पोळा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सन आहे. या दिवशी घराघरांमध्ये पुरण पोळी, करंजी व ५ भाज्यांची भाजी केली जाते. अशीच आपली संस्कृती उप्जावून ठेवूया, महाराष्ट्र धर्म वाढवूया 🙂
पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्चा.