Surekha's Kitchen

Call Directions

Surekha's Kitchen Learn all innovative and tasty recipes with Surekha recipe's

पुरणाचे दींड            पुरणाचे दिंडे बनवायला खूपच छान असतात! नागपंचमीसाठी ही खूप पारंपरिक रेसिपी आहे. मी तुम्हाला याची ...
14/08/2026

पुरणाचे दींड

पुरणाचे दिंडे बनवायला खूपच छान असतात! नागपंचमीसाठी ही खूप पारंपरिक रेसिपी आहे. मी तुम्हाला याची सविस्तर रेसिपी सांगते.
पुरण तयार करण्यासाठी, एक २ कप चणा डाळ चांगली धुऊन मऊ शिजवून घ्या. शिजलेल्या डाळीतील पाणी काढून टाका आणि ती गरम असतानाच त्यात अडीच कप साखर घालून मंद आचेवर शिजवून घ्या. पाकावर आल की पूरण यंत्र किंवा मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. अर्धा चमचा वेलची पावडर,एक चमचा जायफळ पावडर मिक्स करा. आता पुरण तयार आहे.
आता दिंड बनवण्या साठी कणिक मळून घ्यावी कणके मध्ये २,३ चमचे तेल,१/२ चमचा मीठ घालून कणीक घट्ट भिजवून ठेवा. कणिक मुरली की लहान पोळी लाटून घ्या व त्यावर पुरण भरून पोळी दुमडून घ्या. असे सर्व दिंड तयार करून घ्या. नंतर इडली पात्रात वाफवून घ्या.व नंतर तूप घालून गरम गरम सर्व्ह करा.
आता पर्यंत च्या सगळ्या रेसिपी आपल्याला कश्या वाटल्या ते लगेच लाईक व कमेंट करून सांगा.

🧅कांदा भजी 🧅           कांदा भजी करण्यासाठी, पातळ उभी चिरलेली कांदे घ्या. त्यात बेसन, थोडा तांदळाचा पीठ,हिरव्या मिरच्या ...
27/07/2026

🧅कांदा भजी 🧅

कांदा भजी करण्यासाठी, पातळ उभी चिरलेली कांदे घ्या. त्यात बेसन, थोडा तांदळाचा पीठ,हिरव्या मिरच्या बारीक चिरून, ओवा, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका. हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करा, गरज वाटल्यास पाण्याचा हलका शिंतोडा द्या. त्यामध्ये गरम तेलाचे मोहन घाला,आता गरम तेलात ही भजी खरपूस तळून घ्या.

🥔🥔बटाटा भजी🥔🥔        बटाट्याची भजी करण्यासाठी, एका भांड्यात बेसन घ्या, त्यात हळद, तिखट, ओवा, मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा ...
27/07/2026

🥔🥔बटाटा भजी🥔🥔

बटाट्याची भजी करण्यासाठी, एका भांड्यात बेसन घ्या, त्यात हळद, तिखट, ओवा, मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घाला. थोडं पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा. बटाट्याचे पातळ काप करा. कढईत तेल गरम करून, बटाट्याचे काप पिठात बुडवून तळून घ्या. चला मग तयारीला लागा😍

मूग पकोडे                   मूग पकोडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मूग डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर त्यातील प...
27/07/2026

मूग पकोडे

मूग पकोडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मूग डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून टाका आणि डाळ जाडसर वाटून घ्या. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, जिरे, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता गरम तेलात या मिश्रणाचे छोटे गोळे सोडून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
मग तोंडाला पाणी सुटलं न!

🌽🌽कॉर्न भजी 🌽🌽         कॉर्न भजी बनवण्यासाठी साहित्य: १ कप स्वीट कॉर्न, अर्धा कप बेसन, पाव कप तांदळाचं पीठ, एक बारीक चिर...
27/07/2026

🌽🌽कॉर्न भजी 🌽🌽

कॉर्न भजी बनवण्यासाठी साहित्य: १ कप स्वीट कॉर्न, अर्धा कप बेसन, पाव कप तांदळाचं पीठ, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक तुकडे केलेलं आलं, लसूण , हिरवी मिरची, जिरे किंवा ओवा, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ.
कृती: सर्वप्रथम कॉर्नला थोडे बारीक करून घ्या. आता सर्व साहित्य एकत्र करून, त्यात थोडं पाणी घालून घट्ट बॅटर बनवा. कढईत तेल तापत ठेवा त्यात दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालाआणि त्यात भजीचे छोटे गोळे सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. कॉर्न भजी आणि गरम गरम चहा☕️
पावसाळ्यात भजे खायची मज्जा वेगळीच😀

दडपे पोहे   नारळाचं पाणी आणि ओलं खोबरं टाकून दडपे पोहे बनवण्यासाठी ऐका भांड्यात 3 वाटी पोहे त्यात 1/2 वाटी नारळ पाणी टाक...
30/04/2026

दडपे पोहे
नारळाचं पाणी आणि ओलं खोबरं टाकून दडपे पोहे बनवण्यासाठी ऐका भांड्यात 3 वाटी पोहे त्यात 1/2 वाटी नारळ पाणी टाकून पोहे हलक्या हाताने भिजवून घ्या,एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, किसलेलं ओलं खोबरं, मीठ आणि थोडी साखर मिक्स करा. आता त्यात फोडणीसाठी तेल गरम करून शेंगदाणे मोहरी, जिरी, हिंग, कढीपत्ता, हळद टाकून खमंग फोडणी द्या. ही फोडणी पोह्यांवर टाका आणि हलक्या हाताने एकत्र करा, झाले आपले दडपे पोहे तयार! फोडणीत साडंगी मिरची टाकल्या मुळे खूपच छान चव येते ,सोबत पोह्याचा पापड😋

सातूच पीठ      उन्हाळ्यात सातूचं पीठ खाणं खूप चांगलं असतं, कारण हे पचायला हलकं असतं आणि शरीराला थंडावा देतं. यात प्रोटीन...
30/04/2026

सातूच पीठ
उन्हाळ्यात सातूचं पीठ खाणं खूप चांगलं असतं, कारण हे पचायला हलकं असतं आणि शरीराला थंडावा देतं. यात प्रोटीन्स आणि फायबरही भरपूर असतं, ज्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि थकवा कमी होतो. तुम्हाला सविस्तर रेसिपी सांगते
सातूचं पीठ बनवण्यासाठी, गव्हाच्या कण्या, दाळ्या, जिर आणि सुंठ थोडं—थोडं भाजून घ्यायचं. थंड झाल्यावर हे सगळं एकत्र बारीक करून पीठ तयार करायचं. आता हे पीठ एका भांड्यात काढून, त्यात तुमच्या आवडीप्रमाणे गूळ विरघळवलेलं पाणी किंवा दूध घालून कालवायचं. मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ नसावं, चमच्याने खाता येईल असं ठेवा. तयार झालं तुमचं सातूचं पीठ! यात थोडे सुंठ पावडर किंवा वेलची पावडर घातली तरी चालेल, खमंग लागत करून बघा आणि सांगा कसं झालं ते.

🥭कैरी भात किंवा रावण भात🥭कैरीच्या भाताची रेसिपी हा भात खूपच चटपटीत लागतो.सर्वात आधी एक कप तांदूळ शिजवून थंड करून घ्या. भ...
30/04/2026

🥭कैरी भात किंवा रावण भात🥭
कैरीच्या भाताची रेसिपी हा भात खूपच चटपटीत लागतो.
सर्वात आधी एक कप तांदूळ शिजवून थंड करून घ्या. भाताची शितं मोकळी असली पाहिजेत.
आता एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरी, शेंगदाणे, चणा डाळ, उडदाची डाळ आणि सुक्या लाल मिरच्या टाकून खमंग फोडणी द्या.
त्यानंतर त्यात कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडासा हिंग आणि हळद घाला.
आता यात किसलेली कच्ची कैरी टाकून परतून घ्या. कैरी थोडी मऊ झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ , साखर घाला.
शेवटी,यात थंड केलेला भात मिक्स करा आणि हलक्या हाताने परता.
झाला तुमचा खमंग कैरीचा भात तयार! कसा वाटला ते जरूर सांगा बरं🙂🙂

🥭कैरी ची कढी🥭       सर्वात आधी कच्ची कैरी चांगली धुवून कुकरमध्ये तीन—चार शिट्ट्या करून मऊ शिजवून घ्यावी. थंड झाल्यावर ति...
30/04/2026

🥭कैरी ची कढी🥭
सर्वात आधी कच्ची कैरी चांगली धुवून कुकरमध्ये तीन—चार शिट्ट्या करून मऊ शिजवून घ्यावी. थंड झाल्यावर तिची साले काढून गर एका भांड्यात काढून घ्यावा आणि त्यात थोडे बेसन व पाणी घालून तो एकजीव करण्यासाठी रवीने किंवा मिक्सरवर बारीक करून घ्यावा. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता ची फोडणी द्यावी. त्यात वाटलेला कैरीचा गर घालून गूळ, मीठ आणि थोडे पाणी घालून चांगली उकळी काढावी. ही झाली आंबट—गोड कैरीची कढी तयार!

🥭🥭कैरी पन्हं🥭🥭                  कैरीच्या पन्ह्यासाठी पाव किलो कैरी धुऊन कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून शिजवून घ्या. थंड झा...
16/04/2026

🥭🥭कैरी पन्हं🥭🥭

कैरीच्या पन्ह्यासाठी पाव किलो कैरी धुऊन कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून शिजवून घ्या. थंड झाल्यावर तिची साल काढून कोळ काढा.
आता त्या कोळामध्ये एक वाटी गूळ किंवा साखर, पाव चमचा काळं मीठ, वेलची पावडर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तयार झालं कैरीचं पन्हं! पिताना बर्फाचे तुकडे घाला म्हणजे अजून छान लागेल. उन्हाळ्यात पन्हं पिऊन बाहेर पडले तर ऊन लागत नाही आणि हे तर सगळ्याचं आवडत पेय आहे.

Address

Pune
411047

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9822708373

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surekha's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share