29/05/2026
दरवर्षी २९ मे रोजी जागतिक पाचक आरोग्य दिन (World Digestive Health Day) पाळला जातो. पचनसंस्थेचे आरोग्य आणि त्याशी संबंधित आजारांबद्दल समाजात जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
२०२६ ची थीम: या वर्षीची मुख्य संकल्पना "क्रॉनिक डायरिया: डोन्ट फ्लश द साइन्स अवे" (तीव्र/दीर्घकालीन अतिसार: लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका) अशी आहे.
पचनाचे महत्त्व: आपली पचनसंस्था केवळ अन्न पचवण्याचे काम करत नाही, तर आपल्या शरीरातील जवळजवळ ७०% रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक आरोग्य देखील आतड्यांच्या स्थितीवर अवलंबून असते.
*पचन आरोग्य सुधारण्यासाठी टिप्स*
१. भरपूर पाणी प्या: शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्याने बद्धकोष्ठता होत नाही.
२. फायबरयुक्त आहार: आहारात फळे, अंकुरित मोड, भाज्या आणि तृणधान्यांचा समावेश करा.
३. व्यायाम: नियमित व्यायामामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचनक्रिया उत्तम राहते.
४. झोप: रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २-३ तास आधी करा.
५. रात्री वेळेवर झोपा आणि पुरेशी झोप घ्या.