Gavkari

Gavkari Pure Kolhapuri Non-Veg Hotel In Kharghar Sector No 13, Black Chickan, Tambda and Pandhara Rassa. Fir

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व कोल्हापूर इथले मांसाहारी पदार्थ असो अगर शाकाहारी त्याला एक वेगळाच बाज आहे, थाट आहे! खारघर...
21/03/2021

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व कोल्हापूर इथले मांसाहारी पदार्थ असो अगर शाकाहारी त्याला एक वेगळाच बाज आहे, थाट आहे!

खारघर मध्ये अस्सल कोल्हापुरी खायचे म्हंटल तर ह्यांच नाव अग्रस्थानी आहे.
" #गावकरी"
नावातील झणझणीत काढले आहे पण पदार्थात छान कोल्हापूरी झणझणीतपणा मसाल्याचा यथोचित वापर आहे.

#ब्लॅकचिकन - बच्चेकंपनी मध्ये हिट आहे ही डिश लुसलुशीत चिकन नावाप्रमाणेच काळ्या मसाल्यात घोळवलेल मस्तच मला फक्त मसाला खायला मिळाला थोडा बाकी सर्व पोरांनी संपवल.

#मटणखर्डा- एकच शब्द ह्याच्यासाठी झ्याक. झणझणीत ठेच्याच्या बेस मध्ये बनवलेले बोकडाचे मटन ही डिश मी कायम पार्सल मागवतो पण इथे गरम गरम खाण्यातच मजा आहे.

चिकन स्पेशल थाळी बघूनच नक्कीच खुश सुक्के ते मसाला सर्वच झक्कास

बोकडाचे मटण ही गावकरीची खासियत

दोन्ही मटण थाळी अप्रतिम कुठल्याही पदार्थाला नाव ठेवायची सोय नाही.

स्टार of the Meal for me Was तांबडा अन पांढरा रस्सा.. पार कोल्हापूरच्या पेठेतील खानावळीत जेवतोय अगदी तस्साच फील येतो.

झणझणीत तांबडा रस्सा मटणाचा stock वापरून बनवलेला पांढरा तर फार कमी ठिकाणी मिळतो हा खारघर मधील one of the top मध्ये तुमच्यासाठी..

एकूण आमची weekend सुरुवात झक्कास झाली मुख्य म्हणजे मसाल्याचा अतिरेक नाही कुठेही "कोल्हापूरी ही चव आहे तिखट जाळ म्हणजे कोल्हापूरी न्हव" हे तंतोतंत पाळले आहे इथे.
हॉटेल सजावट बैठक मन लाऊन केली आहे दर ही reasonable आहेत. मला कोल्हापुरात पेठेत जेवल्याचा फील आला ह्यात सर्व आले.

पातळ सुरेख केलेल्या भाकरी पण खाल्ल्या ज्या घरी खात नाही.. सर्वांच्या Mamma आता बघतील त्यावर आपल्याला काय 😁.

हॉटेल गावकरी, खारघर

आपला माणूस
सुशांत ७३५०० ४४१४४

There is no better love than the love of food, happy valentines day everyone.                Sushant 73500 44144
17/03/2021

There is no better love than the love of food, happy valentines day everyone.

Sushant 73500 44144

If you haven't heard already, we're now delivering in and around   also.Bringing  's favorite   closer to your doorstep!...
14/03/2021

If you haven't heard already, we're now delivering in and around also.

Bringing 's favorite closer to your doorstep!

Order via Zomato Swiggy today or place a takeaway order from our Kharghar outlet on
+91 73500 44144

नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा सृष्टि के जनम से भी ओ.. पहले तेरा वास था |
11/03/2021

नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा सृष्टि के जनम से भी ओ.. पहले तेरा वास था |

02/03/2021

जुन्या काळातील लग्न😊

लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो चे घड्याळ हातामध्ये सगळ्यांना दिसेल दिमाखात दाखवत, गावात पूर्ण फेरफटका मारायचा, त्यावेळेस त्याची शान काही औरच होती. आत्ताच्या नवरदेवांना त्याच्या शंभर पट मिळाले, तरी त्याची सर येणार नाही हे नक्की.

लग्नाच्या दोन दिवस अगोदर सर्वांसोबत बुंदी बनविण्यासाठी केलेले जागरण, किंवा लापशी वा भात बाजेवर टाकून नंतर वाढायला घेतांना अक्षरशः वापरलेले फावडे, पिण्यासाठी नदीवरून बैलगाडीने टिपाड भरून आणताना पूर्ण ओलेचिंब होणे, हे सर्व इतिहास जमा झालेय.

लग्नाआधी मुला-मुलीच्या वडिलांसोबत त्यांना घालावयाची आंघोळ, त्यानंतर सर्वांना आग्रहाने धरून आणून कपाळभर भरलेला मळवट, त्यावरून लावलेली चमकी सगळे नव्या पिढीला पटणार देखील नाही.... कालाय तस्म..

"आली ईईईईई लग्नघटी समीप नवरा" ... अशी आरोळी कानावर पडली की बूड झटकायला सुरुवात करायची. नंतर वाजवा रे वाजवा .... असे बामन म्हणला, की मंडपाच्या बांबूला पाठ लावून बसायचे ... जेणेकरून "तदेव लग्नम सुजनम तदेव.. ताराबलम चंद्रबलम" ऐकायच्या आत मुठीत कोंबलेल्या रंगीत अक्षता नवरानवरीच्या अंगावर बचकन फेकून पायाला रुतणारे ढेकळ बाजूला करायचे .... पहिली पंगत !

गावातल्या लग्नात जेवायची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल, त्यांना कोणत्याही महागड्या हॉटेलात अजिबात मज्जा येणार नाही. तिकडे नवरा नवरी होमाभोवती गिरक्या मारे पर्यन्त पत्रावळी वाला पंगतीत फिरायला सुरुवात करतो । (पत्रावळी म्हणजे पळसाची पाच सहा पाने काड्यांनी शिवून बनवलेले ताट) या पत्रावळी निम्म्या तरी फाटलेल्या असत त्यामुळे दोन जोडून घ्याव्या लागत. पत्रावळी वाटणारी मंडळी विशेष क्रूर आणि निष्ठूर का असत कोण जाणे ! फाटलेली पत्रावळ बघून सुद्धा मुद्दाम दुसरी पत्रावळ देत नसत ... आणि जर दिलीच तर तीही एकदम तुकडा झालेली. जणू लग्न यांच्या घरचे असते, अशा थाटात तुच्छ कटाक्ष टाकून बघत.

पत्रावळ ढेकळांवर ठेवली की ती सरळ कधीही राहत नसे. त्यासाठी खाली ढेकळांची खास सेटिंग करावी लागे. कशीबशी पत्रावळ सेट केली, तर वारा येई आणि ही बया इकडेतिकडे उडू लागे. त्यासाठी एक वजनदार ढेकूळ पत्रावळीवर ठेवावा लागे. पत्रावळी स्थानापन्न झाल्या, की मीठ वाढणारा अतिशय घाईत असणारा येई आणि कुठल्याही भिंतीवर निर्लज्जपणे थुंकल्यासारखा बरोबर मध्यभागी मिठाची बचक सोडे. याना पत्रावळीला काठ असतात हे माहीत नसावे. त्याच्या मागोमाग बुंदी वाढणारे झांजपथक येते. जिथे मीठ वाढलंय त्यावर नेम धरून बुंदी वाढायची असा प्लान करून आलेले असत, दुष्ट साले. सगळी बुंदी खारट होऊन जाई.

मीठ आणि बुंदी कष्टपूर्वक वेगळे करेपर्यंत मोठया टोपलीत भात घेऊन दोघेजण पळत येत. दोघांच्या हातात भात वाढायला चहा प्यायच्या बशा असत. एकाच वेळी दोन पंगती वाढताना टांग्याला जुंपलेल्या बिगरखांदी बैलांसारखे शिवळा ताणत पुढे पुढे धावत. बुंदीच्या अंगावर सांडलेला भात बाजूला करेपर्यंत वरणाची बादली येई. वरण वाढणारी मंडळी बिनडोक असत. भाताचे कितीही छान आळे बनवले तरी तो वरण नावाचा द्रव आळ्याच्या बाहेर ओतायचा चंग बांधून आलेले असत. भाताचा कोथळा फोडून बाहेर वाहणारे वरण आवरता आवरता जेवणारा घामेघुम होऊन जाई.

वरणाची बादली पुढे सरकल्यावर मागून झणझणीत वांगं उसळीची बादली नाचत येते. उसळीत घुसवलेले वग्राळे तर्रर्रर्ररीसकट बाहेर येई आणि पत्रावळीवर उताणे होई. यामुळे नुकताच कालवून ठेवलेला वरणभात आणि निसून ठेवलेली बुंदी मिठाच्या ढिगाऱ्यासह ओलेचिंब होई.

काड्यांनी शिवलेल्या पत्रावळीने एव्हाना दम तोडलेला असे. तिच्या फटीमधून वरण आणि उसळीचा रस्सा ढेकळात झिरपू लागतो.... एखादा ओघळ पत्रावळीचे काठ ओलांडून थेट वाढणाऱ्याच्या पायांखाली लोटांगण घालतो.. त्यात जरका सोसाट्याचा वारा आला तर गम्मत नका विचारू...

शेताच्या बांधावरचा पाचोळा, घरामागच्या उकिरड्यावरची राख आणि नुकतीच कापून फेकलेल्या हरळीची पाने कालवलेल्या भातावर येऊन बसत. आता भातातून बुंदी निवडायची की हरळीची पाने या संभ्रमात असलेला जेवणारा "वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे" ही राकट, चिडलेल्या आवाजातली आरोळी ऐकतो आणि पहिली बुंदीची बचक तोंडात सारी.

बुंदी खाताना मंडपाच्या छताकडे बघायला लागे. त्यामुळे खाली पत्रावळीत गुपचूप येऊन पडलेली मणभर भाताची बशी बघायला चान्स नाही. मागून तिच्या अंगावर तुटून पडणारा वरणवाला सरकारी काम असल्यासारखा भडकन वरण ओतुन पळूनही जाई..

काही मिनिटातच पत्रावळीतून जसे पाणी खाली झिरपते, तसाच खालचा ढेकूळ पत्रावळीत झिरपून वर येऊ लागे. आधीच बुंदी आणि उसळीत रंगलेला भात ढेकळाच्या नामस्मरणात कधीच सावळा विठठल बने....

बाराचे लग्न अडीच ला लागलेले असते, त्यामुळे खाणारे पत्रावळीच्या दुर्दशेकडे न बघता एकामागे एक ढिगारे संपवत इतस्ततः पसरलेले मीठ बोटांवर चोळून पत्रावळीची घडी करत.. ती पुन्हा उडू नये म्हणून तिच्या बोकांडी मोठा ढेकूळ ठेवत आणि पाण्याच्या टँकरकडे धावत. एकाच पाईपला ठिबक सिंचनच्या दहा नळ्या जोडून चिखलात रुतलेला हा स्थितप्रज्ञ पाईप अर्धे पाणी खाली सांडवत असे...

पहाटे ५ वाजता भरून आणलेला थंड पाण्याचा टँकर एव्हाना अंघोळीच्या पाण्यासारखा गरम झालेला असे. प्लास्टिकच्या रंगीबेरंगी ग्लासातून दोन घोट पाणी पिऊन नवरा नवरीला आशीर्वाद देत लोक आल्या मार्गाला लागत..... येताना खिशात लपवलेला प्लास्टीकचा ग्लास म्हणजे त्यांना ऑस्कर पुरस्कार वाटत असावा...

#२-५ रुपये आहेर केल्याच्या बदल्यात पोटभर धूळयुक्त जेवण आणि एक प्लास्टिकचा ग्लास..😊

💐💐💐💐💐💐💐💐💐💐


#टीप: आपल्या सारख्या नव्या-जुन्या पिढीने..... हे सगळं अनुभवणं कदाचीत राहूनच गेलं... असेल.... किमान नवीन पीढ़ीला सेंड करा.... वारसा, वहीवाट, चालीरीती, इतिहास जिवंत राहील.!

copy pest

"When our souls are happy they talk about food"Maharashtrian delicacy menuTiffin for Students, Working People, Individua...
01/03/2021

"When our souls are happy they talk about food"

Maharashtrian delicacy menu

Tiffin for Students, Working People, Individual, Families

For more information on subscriptions and offers. Order now! 🍝

Call us today!
Call 7350044144 / 7620621727

हे फक्त म्हणायचं असतंया बघा......कांदा खायचा त्यो बी एका बुक्कीत फोडून हान कि बडीव हॉटेल गावकरी, खारघर आपला माणूस सुशांत...
22/02/2021

हे फक्त म्हणायचं असतंया बघा......कांदा खायचा त्यो बी एका बुक्कीत फोडून

हान कि बडीव

हॉटेल गावकरी, खारघर
आपला माणूस
सुशांत ७३५०० ४४१४४
आत्मनिर्भर प्रशांत

kolhapurkar life revolving around these four 'म'So which म you like.                   हॉटेल गावकरी, खारघर आपला माणूस सु...
14/02/2021

kolhapurkar life revolving around these four 'म'

So which म you like.



हॉटेल गावकरी, खारघर
आपला माणूस
सुशांत ७३५०० ४४१४४

𝐘𝐨𝐮 𝐝𝐨𝐧'𝐭 𝐡𝐚𝐯𝐞 𝐭𝐨 𝐄𝐀𝐓 𝐋𝐄𝐒𝐒, 𝐘𝐨𝐮 𝐣𝐮𝐬𝐭 𝐡𝐚𝐯𝐞 𝐭𝐨 𝐄𝐀𝐓 𝐑𝐈𝐆𝐇𝐓.Introducing TIFFIN SERVICE starting at 𝐑𝐬 50/meal.A customer's pe...
13/02/2021

𝐘𝐨𝐮 𝐝𝐨𝐧'𝐭 𝐡𝐚𝐯𝐞 𝐭𝐨 𝐄𝐀𝐓 𝐋𝐄𝐒𝐒,
𝐘𝐨𝐮 𝐣𝐮𝐬𝐭 𝐡𝐚𝐯𝐞 𝐭𝐨 𝐄𝐀𝐓 𝐑𝐈𝐆𝐇𝐓.

Introducing TIFFIN SERVICE starting at 𝐑𝐬 50/meal.

A customer's perfect satisfaction- both veg and non-veg food items with Homemade & Healthy Tiffin Service in Kharghar.

तु दिलास आन् आम्ही खाल्लं....... वाट बघा हॉटेल गावकरी, खारघर आपला माणूस सुशांत ७३५०० ४४१४४
10/02/2021

तु दिलास आन् आम्ही खाल्लं....... वाट बघा

हॉटेल गावकरी, खारघर
आपला माणूस
सुशांत ७३५०० ४४१४४

पुछता है गावकरी|क्या खाओगे आप|ब्लॅक चिकन / मटणखर्डा चिकन / मटणसुक्का चिकन / मटणपाया अळणी  सूप रस्सा चिकन / मटणहॉटेल गावक...
05/02/2021

पुछता है गावकरी|

क्या खाओगे आप|

ब्लॅक चिकन / मटण
खर्डा चिकन / मटण
सुक्का चिकन / मटण
पाया अळणी सूप
रस्सा चिकन / मटण

हॉटेल गावकरी, खारघर
आपला माणूस
सुशांत ७३५०० ४४१४४

इतिहास नळी खाण्याचाएकदम कडकडून भूक लागल्या आणि समोर मस्त मटणाचे ताट येत. वाडग्यात दिलेल्या रस्सेदार मटणातून एक मोठी भरीव...
02/02/2021

इतिहास नळी खाण्याचा

एकदम कडकडून भूक लागल्या आणि समोर मस्त मटणाचे ताट येत. वाडग्यात दिलेल्या रस्सेदार मटणातून एक मोठी भरीव नळी बाहेर डोकावत असते. ती नळी पाहल्यावर एकदम स्वर्गसुखच. ते फक्त ज्याच्या ताटात नळी आलेली असते त्यालाच माहिती.

पहिल्या घासापासून त्या नळीशी चाळे सुरू होतात. नळीला लागुन असलेले लुसलुशीत मटण खाताना देखील त्या भरीव नळीची खरी मजा देणाऱ्या आतल्या मगज वर आपली नजर कायम असते. मग त्या नळीची उघडी बाजू तोंडात पकडून ओठांचा चंबू करत फुर्रर्रकन आवाज काढत तो मगज तोंडात ओढण्याचा प्रयत्न होतो पण यश येत नाही. मग नळी ताटाच्या एका कडेला ठेऊन पुन्हा जेवणावर लक्ष केंद्रित केले जाते.

ताटात किती जरी मटण असले तरी खाणाऱ्याचे सगळे लक्ष त्या नळीतल्या मगज वरच असते. दर दोन घासानंतर ती नळी उचलून ओठांचा चंबू करत ती रिकामी करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू असतो. मग लक्षात येते की ही नळी पण आपल्या सारखीच जिद्दी आहे. म्हणून तिला शेवटी जेवण झाल्यावर बघू म्हणत परत ताटाच्या कोपऱ्यात सरकवली जाते.

बघता बघता जेवण संपते. ४ वाट्या मटण खाऊन झालेले असले तरी आपले लक्ष त्या नळीवरच असते. मोर्चा पुन्हा नळीकडे वळवला जातो. पुढून ओढून नळी रिकामी होत नाही म्हंटल्यावर तिला मागून फोडण्याचा प्रयत्न सुरू होतो. दाढा, सुळे सगळ्याखाली धरून पूर्ण ताकदीनिशी दाबली तरी त्या नळीला काही फरक पडत नाही. पुन्हा हातात धरून तिचे मागून पुढून नीट निरीक्षण होते. पुन्हा जोराचा प्रयत्न केला जातो पण नळीतला थोडा रस्सा आणि लाळेव्यतिरिक्त तोंडामध्ये काहीच येत नाही.

खाणारा घरात बसून खात असेल तर मग बत्ता घेऊन नळी फोडायचा प्रयत्न होतो किंवा नळी हातात पकडून ताटात जोरजोरात आपटून मगज काढण्याचा प्रयत्न केला जातो. कोणीही बघत असले तरी आपण आणि नळी.

पण या जिद्दी नळीची गाठभेट जर एखाद्या हॉटेलात झाली असेल तर खाणाऱ्याच्या प्रयत्नांवर मर्यादा येतात. इकडे तिकडे बघत नळीला ताटाच्या दिशेने दोनचार झटके दिले जातात. पण हाती काही लागत नाही. शेवटी जीव रडकुंडीला येतो. नळीची उघडी बाजू पुन्हा ओठांमध्ये धरून त्यात जीभ घालून चव चाखण्याचा प्रयत्न होतो. पण सगळे प्रयत्न करून दमल्यावर लक्षात येते की किलोभर मटण खाऊन जिरवण्याची ताकद असलेल्याची मटणाच्या एका नळीने जिरवली आहे.

शेवटी त्या नळीकडे एक कटाक्ष टाकला जातो. "एका फुरकीत जर त्यातला मगज जिभेवर आला असता तर काय मजा आली असती राव" या स्वप्नात मन काही क्षण रमते, त्या स्वप्नातच जिभेवर त्याच्या चवीचा आनंद अनुभवला जातो आणि लगेच भानावर येत जड अंतःकरणाने हार मान्य करत आपण ती नळी ताटात परत ठेऊन टाकतो.

ताट समोर आल्यापासून नळीसोबत सुरू झालेले द्वंद्व युद्ध इथे संपुष्टात येते, आपण आपले मन त्या नळीत गुंतवून युद्धात हरलेल्या योध्याप्रमाणे खांदे उतरवून जड पावलांनी हॉटेल बाहेर पडतो. कितीही मटण फस्त केले असले तरी एका नळीमुळे आपला आत्मा अतृप्त राहुन गेलेला असतो.

मित्रांनो या प्रसंगात लेखकाच्या नळीप्रतीच्या वेदना फक्त एक मटण प्रेमी रसिकच समजू शकेल.

हॉटेल गावकरी, खारघर
आपला माणूस

सुशांत ७३५०० ४४१४४

Address

Shop No. 10, Plot No. 139, Shri Swami Samarth CHS Ltd. Sector 13, Kharghar, Navi Mumbai
Navi Mumbai
410210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gavkari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category