19/10/2024
राणे डायनिंग अँड रेस्टॉरंट. (पेरीड ) ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर.(मलकापूर कोकरूड- कराड रस्ता.)
नमस्कार , आतापर्यंत आपण कोकण तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील खुप हॉटेल्स व खानावळींची माहिती घेतली तर आज राणेडायनिंग अँड रेस्टॉरंट कडे वळुया.
आमचे राणे डायनिंग अँड रेस्टॉरंट हे अगदी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गालगत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले सर्व बाबतीत परिपूर्ण असे हॉटेल आहे, परिपूर्ण याचा अर्थ असा कि येथे चहा नाश्ता पासून जेवण तसेच शीतपेय असे सर्वकाही उपलब्ध आहे. आपण कधी कोकण तसेंच गोव्याला भटकंती करायला मुंबई किंवा पुण्याहूण कोकणाच्या दिशेने निघालात तर तुम्ही सकाळपर्यन्त आरामात न्याहारी करण्यासाठी राणे रेस्टॉरंट कडे पोहचाल. कोकरूड चा पूल ओलांडून २0 मिनिटे अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूला हे हॉटेल आहे, डाविकडे पार्किंगची प्रशस्त अशी सुसज्ज व्यवस्था तसेच स्वछतागृह देखील आहे.
नाश्ता करताना आमची राणे स्पेशल मिसळ आणि पोहे वगळू नका, मस्तपैकी फोडणी दिलेले व वरुन ओल्या खोबऱ्याचा किस टाकून सजवलेली पोह्यांची डिश पाहूनच तुमचा प्रवासातील सगळा थकवा निघून जाइल, पोहे खाऊन गरम गरम चहा घेउन पुढील प्रवासासाठी तुम्ही नव्या जोमाने सज्ज व्हाल हे मात्र नक्की. हॉटेलचा स्टाफ तुम्हाला घरच्या प्रमाणे सेवा देईल, स्टाफच्या वागणूकीत तुम्हाला एक चांगुलपणा अन आपलेपणा दिसून येइल. आमच्या हॉटेलची एक खासीयत म्हणजे आमच्याकडे सर्व पदार्थ घरी बनवलेल्या सर्व मसाल्यापासून तयार होतात त्यामुळे त्याची चव इतर ठिकाणा पेक्षा घरच्या जेवणाप्रमाणे चवीला आहे. आमच्याकडे उत्कृष्ट पद्धतीचे शाकाहारी, मांसाहारी आणि मस्त्याहारी जेवण मिळेल. जेवणात थाळी तसेच भाजी सोबत तंदुर रोटी, चपाती आणि भाकरी असते.पुणे -मुंबईतील पाहुण्यांसाठी हे एक पर्फेक्ट ठिकाण आहे. तर या ठिकाणी असे बरेचसे पदार्थ उपलब्ध आहेत जे तुम्ही आवर्जून ट्राय करु शकता. कोकण प्रवासात आमच्या हॉटेलमध्ये नक्की भेट द्या व व्हेज नॉनव्हेज जेवणाचा स्वतः अनुभव घ्या.
रेस्टॉरंट वेळ.
सकाळी 9.30 ते 11.30 नाश्ता.
दुपारी 12.00 ते 5.00 जेवण.
सायं 7.30 ते 11.00 जेवण.
अधिक माहितीसाठी संपर्क :- श्री.रणजित राणे 8605084929 /श्री. ह्रिषीकेश राणे.9923951121.
काही प्रश्न असतील तर comment करा, तुमची मदत करायला आम्हाला नक्कीच आवडेल. पोस्ट ला लाईक करायला विसरु नका व कोकणातील ही उपयुक्त माहिती जास्तीत जास्त शेयर करा.