06/04/2025
आज (चैत्र शुद्ध नवमी – ६ एप्रिल) श्रीराम नवमी...
प्रभू रामचंद्र हे समस्त हिंदूंचे आराध्यदैवत आहे. हजारो वर्षांपूर्वी त्रेता युगात आजच्याच दिवशी दुपारी अयोध्येमध्ये माता कौसल्येच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला होता. श्रीराम हे भगवान श्रीविष्णूंचा सातवा अवतार होत.
मातृपितृभक्त, एकवचनी, महापराक्रमी, एकबाणी, चारित्र्यवान, तत्त्वनिष्ठ, न्यायनिपुण, सज्जनांचा आदर करणारा, प्रजेवर आत्यंतिक स्नेह असा अनमोल सद्गुणांचा समुच्चय असल्याने श्रीरामांना ‘मर्यादापुरुषोत्तम’ मानले जाते. रावणासारख्या अनेक जुलमी राक्षसांचा वध करून श्रीरामांनी पृथ्वी भयमुक्त केली. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी, समाधानी होती. म्हणूनच त्यांच्या आदर्शवत राज्याला ‘रामराज्य’ म्हटले गेले. त्यांच्या ठायी असलेल्या अलौकिक गुणांमुळेच त्यांना ईश्वरस्वरूप मानले गेले आहे.
प्रभू श्रीरामांना भक्तिभावपूर्वक नमन. भाविकांना रामनवमीनिमित्त मंगलमय शुभेच्छा...
जय श्रीराम... श्रीराम जय राम जय जयराम...
#श्रीराम #श्रीरामप्रभू #श्रीरामनवमी #पवित्र_दिवस #अयोध्या #प्रणाम