20/04/2023
नुकतेच कोल्हापुरात "रेडवूड रेस्टॉरंट "आपल्या नव्या रूपासह कोल्हापूरवासी आणि सर्वच खवय्यांसाठी सुसज्ज झाले आहे. राधानगरी रोड, न्यू पोद्दार हायस्कूलजवळ, न्यू वाशी नाका येथील हे रेस्टॉरंट 'अक्कीज बिस्त्रो 'चे सर्वेसर्वा अक्षय अंबर्डेकर आणि रमा अक्षय अंबर्डेकर यांच्या मॅनेजमेंटसह सुरू झाले आहे. सोबत अनुभवी शेफ जितेंद्र करंबे यांचाही सहभाग आहे. शेफ अक्षय यांना पाच वर्षे डिज्नी क्रुझलँड, ओबेरॉय, ली मेरिडियन सारख्या पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये (5star) अनुभव असून त्यात भर म्हणजे त्यांची इंटेरियर डिझायनर पत्नी रमाने आपल्या व्यवसाय कौशल्याने रेस्टॉरंटची सुंदर अंतर्बाह्य रचना केली आहे.
थोडक्यात passion to profession असा प्रवास स्वतंत्रपणे सुरू झाला आणि अक्कीज बिस्त्रो गेली नऊ वर्षे उत्तम कॉन्टिनेन्टल रेस्टॉरंट म्हणून नावाजले जात आहे. यातच पुढची भर म्हणजे रेडवूड रेस्टॉरंट ! एसी सेक्शन व्यतिरिक्त आजकाल खूप लोकप्रिय असलेली rooftop ची सोय इथे आहे .. निसर्गाला आपलेसे करण्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून " रेडवूड " चे इंटिरियर केले आहे. खाद्यभ्रमंती करणाऱ्या
सर्वांनाच या रेस्टॉरंटची भेट ही पर्वणीच आहे ! लोकांची आवड निवड लक्षात घेता सर्व प्रकारच्या शाकाहारी व सामिष पदार्थांची मोठीच पंगत आहे.
अगदी कोल्हापूरचा खास तांबडा, पांढरा रस्सा ,चायनीज , ऑथेंटिक पंजाबी असो की मग मॉकटेल्सपर्यंत सर्व गोष्टी तुमच्यासाठी हजर आहेत !
Address:-
पेट्रोल पंप जवळ, पुईखडी, नवीन वाशी नाका, राधानगरी रोड संपर्क : 8080306320