Jay Bhawani Misal

Jay Bhawani Misal Jay Bhawani misal one of the authentic and typical kolhapuri misal Which gives you mouthwatering tes

Jay Bhawani misal one of the authentic and typical kolhapuri misal Which gives you mouthwatering test of kolhapuri spice.

30/11/2021
सामाजिक जाणिवा जपणारी *ड्रीम टीम*~~~~~~~~~~•°•~~~~~~~~~आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीव येण्...
29/06/2021

सामाजिक जाणिवा जपणारी *ड्रीम टीम*
~~~~~~~~~~•°•~~~~~~~~~

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीव येण्यासाठी समाजभान असलेलं संवेदनशील मन असावं लागतं. त्याचप्रमाणे नुसती जाणीव असून सुद्धा चालत नाही, त्या जाणिवेतून काहीतरी कृतीची जोड देणारी इच्छाशक्ती असावी लागते. त्यातूनच केवळ दिखाव्याचं नाही तर स्वतः ला समाधान वाटावं असं समाजकार्य घडतं. अशाच पध्दतीचं सामाजिक काम कोल्हापुरातल्या काही महाविद्यालयीन युवती करत आहेत.
त्यांच्याच टीमच नाव *ड्रीम टीम*.

कोल्हापूरचा ' थोरला दवाखाना ' म्हणजेच CPR. हे CPR हॉस्पिटल म्हणजे कोल्हापुरातील गोरगरीब, कष्टकरी, सामान्य जनतेसाठी आजारपणात आधार देणारं हक्काचं ठिकाण. इथं येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या कठीण काळात त्यांना दोन घास पोटात पडावेत यासाठी ही ड्रीम टीम काम करते.
त्यांच्या मार्फत गेले कित्येक दिवस सकाळच्या अल्पोपहाराची सोय अगदी मोफत केली जात आहे. आज त्यांनी सकाळचा अल्पोपहार बनवण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवून एकप्रकारे आमचा सन्मानच केला.

अन्नदान हे श्रेष्ठदान समजले जाते. आणि हेच काम 'ड्रीम टीम' कर्तव्य भावनेने करत आहे. त्यांच्या टीममधील श्रेया चौगले, श्रुती चौगले, अर्पिता राऊत, आचल कट्यारे या कोल्हापुरी रणरागिनींच्या सत्कार्याला आमचा मनापासून सलाम.

जय भवानी मिसळ
_भावा खाऊन तर बघ..!®_

वाढदिवसाचा आनंद *' चरचरीत '* करणारा केक~~~~~~~~~~~~~~~~~गेली 5 वर्षे आम्ही आमच्या    *जय भवानी मिसळ*  _भावा खाऊन तर बघ.....
27/06/2021

वाढदिवसाचा आनंद *' चरचरीत '* करणारा केक
~~~~~~~~~~~~~~~~~

गेली 5 वर्षे आम्ही आमच्या
*जय भवानी मिसळ*
_भावा खाऊन तर बघ..!®_
या फूड ऑन व्हील रेस्टॉरंट मधून कोल्हापूरच्या जातिवंत खवय्यांना सेवा देत आहोत. आजपर्यंत हजारो खवय्यांनी आमच्या मिसळचे मनापासून कौतुक केलंय. आमच्या मिसळच्या चवीचं खरं श्रेय आहे ते आमच्या घरातील सुगरण म्हणजे आमच्या मातोश्री यांना. आज त्यांचा वाढदिवस. त्यामुळं त्यांना एक सुखद धक्का द्यावा या हेतूने एक वेगळा केक करावा असं मनात होतं.

तसं आम्ही नेहमीच केक घेतो आमचे मित्र गौतम यांच्या flavours मधून. पण गौतम भाई फौंडंट केक करत नाहीत. त्यामुळं आज आम्हाला हवा तसा केक करायला दुसरा पर्याय शोधावा लागणार या विचारात असतानाच आमचे मित्र ( मित्र कसले भाऊच..!) रोहन हातकर यांनी आमच्या मनातली ही अडचण अगदी लगेच सोडवली. त्यांनी सांगितलं, "आता तुम्ही बिनधास्त रहा. केक कशा पद्धतीचा आणि कुठून आणायचा ही जबाबदारी आता माझी."

त्यांनी जातीने लक्ष घालून *Tanu's Cakes* च्या सौ. किमया केसरकर यांना आमच्या व्यवसायाशी संबंधित
* मिसळ च्या प्लेटचा* केक करायची सूचना दिली.

केक घेऊन घरी आलो आणि ज्यावेळी बॉक्स मधून केक बाहेर काढला त्यावेळी सगळ्यांच्या तोंडून आपसूकच *वाह..* निघाला. केक चे फोटो काढण्यातच बराच वेळ गेला.
केक बघताच कधी एकदा ही मिसळ खातो आपलं केक खातो असं झालं होतं.जितका दिसायला उत्तम तितकाच चवीला सुद्धा केक छान होता.

आमचा आजचा दिवस खास बनवणारे आमचे रोहन आणि त्यांच्या भगिनी TANU'S CAKES च्या सौ. किमया केसरकर यांचे मनापासून आभार.

-
*जय भवानी मिसळ*
_भावा खाऊन तर बघ..!®_

15/04/2021

28/03/2021

#कोल्हापुरी_मिसळ
#मिसळ

18/02/2021

 
01/01/2021



Address

Jay Bhawani Misal, New Mahadwar Road, Near Siddhala Garden, Mangalwar Peth, C Ward
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 7am - 11:50am
Tuesday 7am - 11:50am

Telephone

+917798689876

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jay Bhawani Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jay Bhawani Misal:

Share

Category