05/09/2023
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
िक्षक_दिन
आई बाबा संस्कार करून आपली मुले घडवतात, म्हणून ते पहिले गुरू. परंतु शिक्षक चांगले हुशार, विविध कला कौशल्यातील पारंगत विद्यार्थी घडवुन राष्ट्र उभारणीचे पवित्र कार्य करतात.
अंगठ्याकडून सहीकडे नेणारे शिक्षक आणि सहीकडून पुन्हा अंगठ्याकडे नेणारी Technology दोन्ही वंदनियच
शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना नमन 🙏🙏🙏
विसरलो नाही मी
तळव्यावरची जांभळी खूण
फोकाचा तो जाड व्यास
गणित म्हणजे काय अजून?
इतिहासाच्या सनावळी
एकाखाली एक शंभर ओळी
खाडाखोड केलीत तर
जाळ काढेन कानाखाली
शुद्धलेखन अलंकार
निबंधाचा साँलिड त्रास
वहीवरती लाल भोपळे
ओणवे रहा एक तास
आम्ल आणि अल्कली
सारी अक्कल बुडाली
शिवाय होती ठरलेली
शिव्यांची लाखोली
पाढे जर चुकलात तर
पायाखाली तुडवीन
कोंबडीचे पाय काढलेत तर
वहाणेने बडवीन
शीत वारे उष्ण वारे
इकडून तिकडे वाहून गेले
आमचे सारे बालपण
त्यांच्या संगे उडून गेले
गुरुजींच्या भितीमुळे
आपसूक शिकत गेलो
फटके खाल्ले थोडेफार
कणखर मात्र बनत गेलो
आयुष्यातले स्थैर्य
पाच आकडी पगार
कुणामुळे मिळाला
हा सुखी संसार?
ब्रॅडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
कुणास ठाऊक कशासाठी
पापणी थोड़ी ओलावते!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!