Cafe slice Misal

Cafe slice Misal This is a Dedicated Food Specialty For Misal Lovers in Karad and nearby areas

आरोग्याशी मैत्री करणारी माणसं...
01/07/2022

आरोग्याशी मैत्री करणारी माणसं...

कॅफे स्लाइस मिसळमिसळ आणि कॅफे याचे योग्य ठिकाण ज्यात मिळेल कॅफे मेनू सोबत अस्सल चटकदार मिसळ सोबत मोमोज, सँडविच व थालीपीठ...
29/06/2022

कॅफे स्लाइस मिसळ
मिसळ आणि कॅफे याचे योग्य ठिकाण ज्यात मिळेल कॅफे मेनू सोबत अस्सल चटकदार मिसळ सोबत मोमोज, सँडविच व थालीपीठ सुद्धा मग चहा तर आहेच कॉफी सोबत कोल्डकॉफी फ्रेंच फ्राईज सुद्धा उपलब्ध , इथे आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक आणि तुमच्या सेमिनार, भिशी पार्टी, वर्कशॉप साठी योग्य जागा.

आज ७ जूनआज जागतिक पोहे दिवसमिसळ आणि बरंच काही...Cafe slice Misal070206 44141https://maps.app.goo.gl/EyAUrS9C3v1Hzvbg6ज्य...
07/06/2022

आज ७ जून
आज जागतिक पोहे दिवस
मिसळ आणि बरंच काही...
Cafe slice Misal
070206 44141
https://maps.app.goo.gl/EyAUrS9C3v1Hzvbg6

ज्या पोह्यांच्या साक्षीने लग्नगाठी जुळतात, त्या पोह्यांना आपल्या खाद्यसंस्कृतीत विशेष स्थान आहे. सकाळचा नाश्ता पोह्यांशिवाय अधुरा आहे. म्हणूनच पोहेप्रेमी दरवर्षी ७ जून हा ‘विश्व पोहे दिवस’ म्हणून साजरा करतात. आज पोहे खाऊन, खिलवून आणि पोह्याची महती सांगून जगभरात हा दिवस उत्साहात साजरा करतात. पहिला जागतिक पोहे दिवस ७ जून २०१५ रोजी साजरा झाला. त्याचा नेमका प्रणेता कोण आहे हे सांगता येणार नाही. मात्र मॅगीच्या गुणवत्तेवरून वाद सुरू असताना नेमके ट्विटरवर गमतीने कुणी तरी पोहे दिवसाची संकल्पना मांडली आणि पोहेप्रेमींनी ती फार उचलून धरली.
गेल्या वर्षी ट्विटरवर तर जागतिक पोहे दिवस हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये राहिला. पोहे महाराष्ट्रात जितके लोकप्रिय तितकेच देशभरातही आहेत. प्रांत कोणताही असो… कांदे पोहे असो वा बटाटे पोहे दडपे पोहे…करण्याची पद्धत भिन्न असली तरी जिभेचे चोचले पुरवण्याची चव मात्र बदलत नाही.
पोहे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कोकणात विशेषत: भात पिकतं तिथे तर हातसडीचे पोहे, पटणीचे पोहे असे पोह्याचे अनेक प्रकार मिळतात.’दगडी पोहे, पातळ पोहे, जाड पोहे सुगंधी तांदळाचे सुगंधी पोहे तयार होतात. ’दगडी पोहे’ पोहे हे कांदेपोहेच असायला हवेत असं काही नाही. बटाट्याच्या काचऱ्या ही पोह्यात सुरेख लागतात. पण मग पोह्यात 'ती' गंमत येत नाही. वांगीपोहे मात्र कमी आवडीचे. तेलात नीट खरपूस तळलं गेलेलं वांगं पोह्यासोबत असं काही जमून येतं की ज्याचं नाव ते. मटारच्या मोसमात मटार घातलेले पोहे त्याच्या रंगामुळे साजरे दिसतात. एक वेळ कांदा नसेल, तर कोबी घालून पोहे करून बघा, छान लागतात. बटाटे-पोहे करत असताना भरपूर खोबऱ्याचा वापर केला तरी पोहे मऊ राहून ते खाता येतील याची खात्री नसते. मात्र पोहे करताना कांदा वापरला तर पोह्याचा ओलावा धरून राहतो, पोह्याची चव वाढते. कांदा-पोहे किंवा बटाटे-पोहे हा पदार्थ मुलीला उत्तम स्वयंपाक येतो हे दाखविण्यासाठी केले जातात असे दिसते, परंतु कांदा-बटाट्याशिवाय पोहे करायचे असले तर पोहे करणाऱ्याचे खरे स्वयंपाककौशल्य लक्षात येते. फोडणीच्या पोह्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर इटालियन लोकांना पास्ता तसे आपल्याला कांदे पोहे. पोहे ही एक टेम्पलेट आहे, कशीही सजवा. मस्त दिसते आणि लागते. बटाटे, कोबी, वांगी, दोडकी, घोसाळी ही प्रत्येक भाजी घालून होणारे फोडणीचे पोहेही चवीच्या बाबतीत स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व राखून आहेत. सुकी मिरची आणि लसणीची फोडणी घालूनही पोहे उत्तम होतात, पोहे भिजवून, त्यात हिंग, आलं, ओली मिरची, हळद, ओवा घालून बेसनाचं पीठ वापरून भजीही छान होतात, हे पोहा पॅटिस हा एक प्रकार अफलातून. मीठ-मिरचीचे पोहे करून, त्यात भाजलेले शेंगदाणे, आलं, कोथिंबीर, साखर घालून त्याचं सारण बनवायचं. उकडलेल्या बटाट्यांचा लगदा करून त्याची पारी करून त्यात हे सारण घालून तळलं, की पोहा पॅटिस तयार. . इंदोरला गेलात तर तिथले पोहे जरुर खावे. फ़ोडणीच्या पोह्यांसारखे दिसतात, पण असतात इंदोरी गोड...बढ़िया म्हणत आनंद घ्यावा. आणि नागपुरचे पोहे तर..? वर अशी झणझणीत तर्री....! अहाहा...मिसळीच्या बऱ्याच जवळ जाणारा हा पदार्थ आहे. नागपुरी झणझणीत पोह्याच्या प्रकारापेक्षा अगदी उलट म्हणजे गोडाचे पोहे. नारळाच्या वा साध्या दुधातले दूध गूळ पोहे पण गोडभक्तांना खूप आवडतात.
बेबीफूड म्हणून पोह्यांचा उपयोग करता येतो.... जाडे पोहे थोड्या तुपावर भाजायचे आणि त्याची पूड करायची. मग रोज थोडी पूड गरम दुधात घालायची. हवी तर साखर घालायची. छान लागते शिवाय पौष्टिक आहे.
पोह्याचे आरोग्यदायी फायदे -

कार्बोहाड्रेटस चा उत्तम स्त्रोत -

पोह्यात 76.9 टक्के कार्बोहाड्रेटस असतात. तसेच पोह्यात 23 टक्के फॅट्स असतात. कार्बोहाड्रेटसमुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो.

शरीराला लोहाचा पुरवठा होता -

पोह्यात लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरून लोखंडी रूळ फिरवले जातात. या प्रक्रियेत लोह्याचा अंश पोह्यात शिरतो. त्यामुळे यात लोहाचे प्रमाण अधिक असते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण -

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्यांचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. पोह्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.

पचनास हलके -

पोह्यांचा नाश्ता पचनास हलका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्याचा समावेश केला जातो. पोह्यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक खूप कमी लागते.

लठ्ठपणा येत नाही -

पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी 250 कॅलरीज असतात. तसेच पोह्यांमध्ये व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात.
पोहे प्रेमीना जागतिक पोहे दिनाच्या शुभेच्छा.

28/05/2022
Coming soon.....
01/08/2019

Coming soon.....

आजच आपली ऑर्डर निश्चित करा...
11/07/2019

आजच आपली ऑर्डर निश्चित करा...

23/06/2019

Address

Shivatirtha Hights, Shop No. B-1 Vakhan Road, Mangalwar Peth Karad
Karad
415110

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Telephone

+917020644141

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cafe slice Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cafe slice Misal:

Share

Category