16/02/2019
Me, Harmony speaking.....
Hi, I am harmony. Since past 2 days I am homeless. I stay in krishna’s flute. Our life is really joyful. Me and Krishna. That day Krishna told me, “Let’s go to roam around the world. Today is Valentine day. We can have more fun, as every heart will be blossomed with the fragrance of love”.
And really we were enjoying like anything since morning. I was lost in dancing and singing. But suddenly in the evening, I noticed that music was stopped. Krishna was not there around me. He took his flute and disappeared. Oh my god, I do remember now, I could hear a loud bomb blast.
I heard, Many soldiers were killed and injured in that blast. That bomb blast must have damaged my krishna’s flute. Yes. Now I know. This is the only reason.
Because many times I have experienced this. Whenever I heard that terrific voice, Krishna was disappeared. He takes lots of time to come back to me.
You only tell him something my dear friends...... Do something. Do something in such a way that, that terrific voice itself should not come again.
मी हार्मोनी, Harmony ,
(In Marathi)
दोन दिवसांपासून बेघर फीरतेय. कृष्णाच्या बासरित माझं वास्तव्य असतं. खूप आनंदात असतो आम्ही. मी आणि कृष्ण. परवा कृष्ण म्हणाला, "चल जाऊया फिरायला. आज खूप मज्जा येईल. valentine day आहे. सगळ्यांची हृद्यये फुललेली असतील प्रेमाने". खरंच सकाळपासून खूप धम्माल केली आम्ही. माझा पाय तर जमिनीवर टिकेना. भान हरवून मी नाचत आणि गात होते. आणि त्या संध्याकाळी कृष्ण त्याच्या बासरीसकट अचानक कुठे निघून गेला माहित नाही. खूप शोधलं त्याला कुठेच दिसला नाही. हो यार ! आत्ता आठवलं.... त्या दिवशी संध्याकाळी खूप मोठा आवाज आला होता. बॉम्ब ब्लास्ट झाला होता म्हणे. आपल्या काही जवानांना त्यात प्राणही गमवावे लागले म्हणतात . माझ्या कृष्णाची बासरी त्यात फुटली तर नसेल !!! हो असच झालं असणार. कारण या आधीहि जेव्हा जेव्हा तो बॉम्बचा भयानक आवाज झाला, तेव्हा तेव्हा कृष्ण मला असाच सोडून गेला होता. त्याला परत यायला खूप दिवस लागतात. तुम्हीच काही तरी करा यार. सांगा त्याला काहीतरी. हा बॉम्बचा आवाजच बंद झाला पाहिजे असं काहीतरी करा ना यार......