Shidoree Thane

Shidoree Thane We are the first theme restaurant in the town, and we are extremely thrilled to say that.

आयत्या वेळेची घाई गडबड टाळण्यासाठी आपली मोदकांची ऑर्डर लगेच नोंदवा..               #मराठीपदार्थ
17/01/2025

आयत्या वेळेची घाई गडबड टाळण्यासाठी आपली मोदकांची ऑर्डर लगेच नोंदवा..
#मराठीपदार्थ

तीळगूळ घ्या, गोड गोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 😊  #मकरसंक्रांती    #मकरसंक्रांती    #तिळगूळ  #संक्रांती ...
14/01/2025

तीळगूळ घ्या, गोड गोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 😊 #मकरसंक्रांती #मकरसंक्रांती #तिळगूळ #संक्रांती

11/01/2025

हिवाळा साजरा करूया - गुळपोळी सोबत,

आयत्या वेळेची घाई गडबड टाळण्यासाठी आपली मोदकांची ऑर्डर लगेच नोंदवा..               #मराठीपदार्थ
17/12/2024

आयत्या वेळेची घाई गडबड टाळण्यासाठी आपली मोदकांची ऑर्डर लगेच नोंदवा..
#मराठीपदार्थ

Elevate your event with our delicious party platters! 🍽Fresh ingredients, stunning presentation, and customizable option...
08/12/2024

Elevate your event with our delicious party platters! 🍽
Fresh ingredients, stunning presentation, and customizable options.
Perfect for any occasion, big or small.
Order now and let us handle the feast!


अभिजात मराठी१५०० वर्षांहून अधिक काळ जुन्या असलेल्या, अमृतासी पैजा जिंकणाऱ्या,छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम ते टिळक,...
05/10/2024

अभिजात मराठी
१५०० वर्षांहून अधिक काळ जुन्या असलेल्या, अमृतासी पैजा जिंकणाऱ्या,छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम ते टिळक, आगरकर, सावरकर ते पुलं, शिरवाडकरांचा वारसा लाभलेल्या माझ्या सर्वांग सुंदर मराठी भाषेला आज सरकारदरबारी अखेर स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला.

जगभरातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी मराठी 'अभिजातच' होती.. अहो का नसेल कोणत्या भाषेला स्वतः चं अभिमान गीत आहे? कोणत्या भाषेत शब्दप्रभु गदिमा आहेत?? मराठी सोडून कोणत्या भाषेत शाहीर साबळेंचा वीर रस आहे??? चितळे मास्तर ते रावसाहेब रंगवणारे काल्पनिक माणसं डोळ्यासमोर उभे करणारे आशिया खंडातले पहिले 'स्टँडअप कॉमेडियन' असलेले पुलं आमच्याच मराठी मातीतले.

पहिला चित्रपट बनवणारे दादासाहेब फाळके सुद्धा मराठी आणि गानसम्राज्ञी लतादीदी सुद्धा आमच्याच, भीमाण्णा पण आमचे आणि विक्रमादित्य सचिनही आमचाच.

संविधानाची निर्मिती करणाऱ्या डॉ. बाबासाहेबां सारखे विद्वान सुद्धा ह्याच महाराष्ट्रात, मराठी मातीत जन्मले. ही सगळी नावं ऐकल्यावर कोण म्हणेल की माझी मराठी आज 'अभिजात' ठरली... देर आये,दुरुस्त आये हे जरी खरं असलं तरी ह्याबाबतीत बहुत देर हो गयी सरकार.

पण तरीही खूप खूप धन्यवाद सरकार..

आजचा दिवस काहीतरी खासच होता म्हणायचा एकीकडे माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि दुसरीकडे आमच्या 'शिदोरी' मध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेच्या मंजिरी मराठे आमचं 'ओम सर्टिफिकेट' स्वतः घेऊन आल्या. सगळ्यात भारावुन टाकणारा क्षण होता तो म्हणजे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची मुर्ती भेट स्वरुपात दिली तो. आमचं संपूर्ण शिदोरी कुटुंब निःशब्द झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेखाली जेव्हा ती मुर्ती विराजमान झाली तेव्हा नकळत मनांत जयोस्तुते रुंजी घालत होतं...

वर्षभरात ६ खास मराठी खाद्य महोत्सव साजरे करणाऱ्या, उपहारगृहात हट्टाने मराठीच पदार्थ विकणाऱ्या मुंबई मधल्या पहिल्या 'ओम certified' उपहारगृहाला नक्की भेट द्या.

वाट बघतोय.
अद्वैत जोशी
+918108425999.

शिदोरी, दुकान ०१, सिद्धकला हाईट्स, बी केबिन रस्ता, मांजरेकर वाडी, नौपाडा, ठाणे पश्चिम.

#आम्हीथालिपीठंभाजतोआणिवडेतळतो #शिदोरी

इच्छा खूप आहे पण नवरात्रीत रोज थाळी देता येईल का असा विचार करतांना, रोज तीच उपवास थाळी खायला आवडेल का? असा सुद्धा विचार ...
02/10/2024

इच्छा खूप आहे पण नवरात्रीत रोज थाळी देता येईल का असा विचार करतांना, रोज तीच उपवास थाळी खायला आवडेल का? असा सुद्धा विचार आला म्हणुन ठरवलं खास *'लोकाग्रहास्तव'* सगळ्यांची आवडती आणि डोंबिवली मधली *'पहिली उपवास खास थाळी'* अष्टमीच्या दिवशी उपलब्ध असेल...

बाकी उपवासाचं *'भाजलेलं'* थालीपीठ, साबुदाणा खिचडी, वडा, सोलकढी वगैरे पदार्थ रोज रात्री १२.०० पर्यंत डोंबिवली मध्ये आणि रात्री ११.०० पर्यंत ठाण्यात उपलब्ध असतील.....

*सशुल्क घरपोच सुविधा देखील उपलब्ध आहे*.

मुंबई मधले पहिले वहिले *'ओम certified'*, आपल्या माणसाचं आपलं उपहारगृह *'शिदोरी.'*

काय पेक्षा कोण हे महत्वाचं...

नक्की संपर्क करा.

शिदोरी ठाणे:-
+918788304646

#आम्हीथालिपीठंभाजतोआणिवडेतळतो #शिदोरी

उपवास आणि विश्वास म्हणजे 'शिदोरी'लवकरच शारदीय नवरात्र सुरू होईल,कदाचित तुमच्या पर्यंत हा लेख येईल तोपर्यंत नवरात्र सुरू ...
30/09/2024

उपवास आणि विश्वास म्हणजे 'शिदोरी'

लवकरच शारदीय नवरात्र सुरू होईल,कदाचित तुमच्या पर्यंत हा लेख येईल तोपर्यंत नवरात्र सुरू देखील झालं असेल. समाज माध्यमातून आता उपवासाच्या निरनिराळ्या पाककृतींचा मारा सुरू होईल, आम्ही मात्र पारंपरिक चार उपवासाचे पदार्थ विकतो, ते विकताना त्याचं पावित्र्य राखलं जाईल ह्याची काळजी घेताना उपवासाच्या पदार्थांची चूल वेगळी मांडतो. उपवासाची कचोरी, मिसळ नाही मिळणार पण रात्री उशिरापर्यंत 'भाजलेलं' उपवासाचं थालीपीठ नक्की मिळेल आणि हो, वडा सुद्धा ताजा 'तळुन' मिळेल, साबुदाणा खिचडी आणि बटाट्याची भाजी सुद्धा मिळेल.

'शिदोरी' म्हणजे काय असा प्रश्न विचारला असता बाकी काहीही सांगायच्या आधी आमचे डोंबिवली आणि ठाण्याचे ग्राहक सांगतील 'विश्वास'. 'विश्वास शुद्धतेचा, सात्विकतेचा आणि अर्थात चवीचा. इथे सगळं संपतं. 'विश्वासासमोर' बाकी सगळं थिटं आहे.

'शिदोरी' चं ग्राहकांशी असलेलं हे विश्वासावर अवलंबून नातं प्रत्येक टप्प्यावर दृढ करण्याचा आमचा प्रयत्न असतो. 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक' ह्या संस्थेच्या ओम प्रमाणपत्रका बद्दल ऐकलं होतं. आणि आम्ही ठरवलं की आपण शुद्ध शाकाहारी पदार्थ बनवत आहोत, प्रचंड विश्वासाने ग्राहकराजा आम्हांला प्रतिसाद देतो आहे तर ह्या विश्वासावर ओम प्रमाणपत्राची मोहोर उमटली आणि ते सुद्धा 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारका' नामवंत संस्था हे करणार असेल तर दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा.

'शिदोरी' हा मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक' प्रमाणित 'ओम प्रमाणपत्र' धारक एकमेव ब्रँड आहे. सणावाराला खरेदी करतांना लक्ष असुद्या काय पेक्षा कोण हे महत्त्वाचं आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 'स्वच्छ आणि शुद्ध खा आणि स्वस्थ राहा'.

अद्वैत जोशी.
Shidoree, Shop 02, Siddhakala Heights, B Cabin Road. Near Lagu Bandhu, Manjarekar Wadi, Naupada, Thane West. 400652

#आम्हीथालिपीठंभाजतोआणिवडेतळतो #शिदोरी

नवीन पिढीला आकर्षण आणि जुन्या पिढीच्या आठवणीच्या खजिन्यातील अनमोल हिरा बघायला नक्की या... #आम्हीथालिपीठंभाजतोआणिवडेतळतो ...
23/09/2024

नवीन पिढीला आकर्षण आणि जुन्या पिढीच्या आठवणीच्या खजिन्यातील अनमोल हिरा बघायला नक्की या...
#आम्हीथालिपीठंभाजतोआणिवडेतळतो

#मराठी

Address

Shop 01, Sidhhakala Heights, Manjarekar Wadi, Shivaji Nagar, B Cabin. Thane West.
Thane
400602

Opening Hours

Monday 7am - 11:45pm
Tuesday 7am - 11:45pm
Wednesday 7am - 11:45pm
Thursday 7am - 11:45pm
Friday 7am - 11:45pm
Saturday 7am - 11:45pm
Sunday 7am - 11:45pm

Telephone

+918108425999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shidoree Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shidoree Thane:

Share

Category