SURAS Snacks

SURAS Snacks Authentic Maharashtriyan snacks.

22/11/2024

Samosa chat.... superb

30/10/2024

मग........
येताय ना????????
#मिसळ #रत्नागिरी #सुरस

Authentic Maharashtriyan snacks.

"एकोणिस वर्ष"गेल्या १९ वर्षांचा काळ म्हणजे लहानशी खळी आहे खरं तर...तुमच्या आमच्या देखण्या रत्नागिरीच्या गालावरची. पण गेल...
06/08/2024

"एकोणिस वर्ष"

गेल्या १९ वर्षांचा काळ म्हणजे लहानशी खळी आहे खरं तर...तुमच्या आमच्या देखण्या रत्नागिरीच्या गालावरची. पण गेली १९ वर्षं म्हणजे ६९३५ दिवस, २२८ महिने, ९८८ आठवडे आम्ही एक कुटुंब आणि kitchen म्हणून रत्नागिरीकरांच्या अविरत आणि unending प्रतिसादावर आमच्याही नकळत एका "सुरस" कथेचा भाग बनून गेलो आहोत.

या १९ वर्षांत...१५ ऑगस्टच्या शाळेतल्या झेंडावंदन कार्यक्रमानंतर बाबांबरोबर त्यांच्या scooter वरून जिलबी- बटाटा वडा घ्यायला येणारा मुलगा काही वर्षांनी त्याच्या स्वतःच्या गाडीतून एखाद्या संध्याकाळी आई बाबांना खास भेळ खायला घेऊन येतो हे आम्ही पाहिलं आहे.

या १९ वर्षांत...पूर्वी बागडत बागडत चालणारी लहानशी लेक चांगली सणसणीत शिकून- सवरून doctor झाली आणि आजही एखाद्या busy day नंतर तिला "सुरस" च्या चवीची, दर्जा आणि hygiene च्या हमीची, आणि आपुलकीची आठवण येते हे आम्ही अनुभवलं आहे.

गेली १९ वर्षं रत्नागिरीतल्या अनेक कुटुंबांशी, अनेक जोडप्यांशी, अनेक आई वडिलांशी, अनेक शाळकरी मुला-मुलींशी, अनेक चोखंदळ खाद्य रसिकांशी आम्हाला जोडत गेली आणि आता हा बंध इतका घट्ट झाला आहे की त्याविषयी निराळं असं काय बोलणार.

गुरुवार, ८ ऑगस्ट २०२४ रोजी या '' प्रवासाची १९ वर्षं पूर्ण करतो आहोत त्यानिमित्ताने...तुमचे दोन लाडके पदार्थ मिळणार आहेत फक्त १९ रुपयांत. सकाळी मिसळ आणि संध्याकाळी भेळ. Offer केवळ निमित्त आहे, आपण सगळ्यांची भेट व्हावी हीच मनीची इच्छा. अवश्य या.

पत्ता :
मधुकृष्ण अपार्टमेंट, सुभाष रोड, रत्नागिरी.

कुरकुरीत चुरमुरे, चटपटीत फरसाण, खुसखुशीत शेव सगळं छान मिसळलं जातं, त्यात घातली जाते आंबटगोड चिंचेची चटणी, टोमॅटो, कांदा ...
18/03/2022

कुरकुरीत चुरमुरे, चटपटीत फरसाण, खुसखुशीत शेव सगळं छान मिसळलं जातं, त्यात घातली जाते आंबटगोड चिंचेची चटणी, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर.
भेळेचं नाव काढलं की जिभ चाळवते. चोखंदळ रत्नागिरीकरांना भेळेचा निर्भेळ आनंद देण्यासाठी, सुरस स्नॅक्स आणि आगाशे फूड कोर्ट सदैव सज्ज आहेत. इथे आहे भेळे सोबतच इतर अनेक चटपटीत चवींचा मेळ..
ह्या चवींचा आनंद आपण घर बसल्या ही घेऊ शकता.
अनबॉक्स अँप वर सुद्धा आम्ही आहोतच. लगेच तुमची ऑर्डर द्या आणि खाण्याचा आनंद घ्या.
संपर्क - ९८२३८८७८९७ / ९६३७२५११९१

15/02/2021

"Renovation म्हणजे काय रे भाऊ?"
"अरे म्हणजे नूतनीकरण."
"असं असं... म्हणजे डागडुजी."
"छे छे...मेल्या डागडुजी म्हणजे repair"
"बरं बरं...तर ते जे renovation आहे ना ते करतायंत आपल्या दुर्वेंच्या "सुरस स्नॅक्स"चं आता त्यामुळे पुढचे 3 दिवस, म्हणजे मंगळवार #दिनांक16फेब्रुवारी ते गुरुवार #दिनांक18फेब्रुवारी सुरस स्नॅक्स, परटवणे, रत्नागिरी बंद राहणार आहे."

"अरे वा...पण आपल्या नाश्तापाण्याची नि संध्याकाळच्या वडा-दाबेली-चहाची पंचाईतच की रे"

"काही नाही पंचाईत. तीन दिवसांचा तर प्रश्न आहे. मग नूतनीकरण झालं असलं तर तीच चव मिळणारच आहे की तुला."

तर ग्राहकहो,
नूतनीकरणाच्या कामानिमित्ताने मंगळवार दिनांक 16 पासून गुरुवार दिनांक 18 पर्यंत सुरस स्नॅक्स बंद राहील. तसदीबद्दल क्षमस्व. या छोट्याशा गॅपनंतर पुन्हा आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोतच.

तेच नातं तीच चव,
अगदी तसंच सुख...
तेच तुम्ही तेच आम्ही
फक्त नवा look 😍

25/01/2021

जगाच्या पाठीवर कुठेही दिसणार नाही अशी उत्सवाची 'वडा- जिलेबी' परंपरा आपण रत्नागिरीकर जपतो.
गेल्या ३० वर्षाच्या 'सुरस'परंपरेचा वसा यावर्षीही जपत प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणीत करूया!
Rashmin Durve Rucha Durve

Address


415612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SURAS Snacks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SURAS Snacks:

  • Want your business to be the top-listed Restaurant?

Share